लवकरच ९६३१७ कोटींचा स्पेक्ट्रम लिलाव जिओ, एअरटेल, वीआय सहभागी होणार!

07 May 2024 12:47:05

Specturm
 
 
मुंबई: डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन (DoT) ने ठेवलेल्या स्पेक्ट्रम बिडिंगमध्ये देशातील महत्वाच्या टेलिकॉम कंपन्या सहभागी होणार आहेत. रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, व्होडाफोन आयडिया या कंपन्या बिडींगमध्ये सहभागी होत स्पेक्ट्रम साठी आपली बोली लावणार आहेत. हे एकूण ९६३१७ कोटींची स्पेक्ट्रम बोली लावणार आहेत. हे बिडिंग ६ जूनपासून सुरूवात होण्याची शक्यता सांगितली जात आहे.
 
मागे २०२२ मध्ये बिडिंगचा कार्यक्रम फार पडला होता. मागच्या बोलीत अदानी समुहाने देखील हिस्सा घेतला असला तरी यंदा तो हिस्सा घेतलेला नाही.सरकार आठ स्पेक्ट्रम बँडची बोली लावणार असून या बोलीची प्राथमिक किंमत ९६३१७ कोटी रुपये ठेवण्यात आली आहे.
 
ज्यामध्ये ८०० MHz, ९०० MHz, १८०० MHz, २१०० MHz, २३०० MHz, २५०० MHz ,३३०० MHz, २६ GHz या बँडचे बिडींग सरकारतर्फे करण्यात येणार आहे. या स्पेक्ट्रम वाटप २० वर्षासाठी होणार आहे. यशस्वी बोली लावलेल्या कंपनीला २० हप्त्यात हे पैसै चुकते करता येणार आहेत. १० मे पर्यंत कंपनी यशस्वी बिडरची नावे जाहीर करण्याची शक्यता आहे.
 
Powered By Sangraha 9.0