निनाद इतिहासाचा. बेडेकरांच्या स्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रम

    06-May-2024
Total Views |

ninad bedekar 
 
मुंबई : इतिहास संशोधक, लेखक, व्याख्याते निनाद बेडेकर यांच्या ९ व्या स्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रम इतिहासाच्या पाऊलखुणा, पांचजन्य फाउंडेशन आणि रावसाहेब ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात, या वर्षीचा, पहिला 'शिवभूषण कै. निनादराव बेडेकर स्मृती पुरस्कार' वितरित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर ज्येष्ठ इतिहास संशोधक, लेखक डॉ. उदय कुलकर्णी यांचे नाव सर्वानुमते पुढे आले. समारंभपूर्वक त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून 'युवा अभ्यासक पुरस्कार' प्रथमेश खामकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. सदर प्रकाशन सोहळा दि. ११ मे रोजी संध्याकाळी ६.३० वाजता पुणे येथे टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कुल येथे गणेश सभागृहात संपन्न होणार आहे.
 
सदर कार्यक्रमात डॉ. उदय कुलकर्णी, ज्येष्ठ दुर्गअभ्यासक प्र. के. घाणेकर बेडेकर यांच्या आठवणींना उजाळा देणार आहेत, सोबतच इतिहास विषयक चर्चासत्र आणि टीम इतिहासाच्या पाऊलखुणा सोबत गप्पाही होणार आहेत. आयोजकांनी इतिहास रसिकांना या विनामूल्य कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.