'टायटॅनिक' मधील कॅप्टनची भूमिका साकारणारे अभिनेते बर्नार्ड हिल कालवश

06 May 2024 11:06:59
titanic  
 
 
मुंबई : 'टायटॅनिक' (Titanic) चित्रपटात कॅप्टनची भूमिका साकारणारे अभिनेते बर्नार्ड हिल यांचे ५ मे २०२४ रोजी निधन झाले. वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांनी (Titanic) अखेरचा श्वास घेतला. आजवर त्यांनी अनेक हॉलिवूड चित्रपटांमध्ये महत्वपुर्ण भूमिका साकारल्या होत्या.
 
दरम्यान बर्नार्ड यांची सहकलाकार अभिनेत्री बार्बरा डिक्सन यांनीच त्यांच्या निधनाची माहिती दिली होती. तिने सोशल मिडियावर पोस्ट करत लिहिले होते की, 'बर्नार्ड हिल यांचे निधन झाल्याची घोषणा मी अत्यंत दु:खाने करत आहे. १९७४ मध्ये विली रसेलच्या 'जॉन पॉल जॉर्ज रिंगो अँड बर्ट' या शोमध्ये आम्ही एकत्र काम केले होते. तो एक अप्रतिम अभिनेता होता. त्यांना भेटणे आणि त्यांच्यासोबत काम करणे हा माझ्यासाठी सन्मान होता. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो’.
 
 
 
बर्नार्ड हिल यांनी काम केलेल्या 'टायटॅनिक' आणि 'द लॉर्ड ऑफ द रिंग्ज' या दोन्ही चित्रपटांना ११ ऑस्कर पुरस्कार मिळाले होते. याशिवाय त्यांनी द घोस्ट एन्ड द डार्कनेस, ट्रु क्राईम, द स्कॉर्पियन किंग, अशा अनेक चित्रपटांत कामं केली होती.
Powered By Sangraha 9.0