प्रसाद ओक कुटुंबासह पोहोचला अयोध्येत; रामललला चरणी झाला नतमस्तक

06 May 2024 17:33:18
अभिनेता प्रसाद ओक यांचा आगामी ‘धर्मवीर २’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.
 
 
prasad oak
 
मुंबई : अभिनेता प्रसाद ओक सोशल मिडियावर सक्रिय असतो. ट्रेण्डिंग रिल्स करणं किंवा समाजात, राजकीय विश्वात घडणाऱ्या घडामोडींवर तो बेधडक आपले मत मांडत असतो. नुकतीच या अभिनेत्याने कुटुंबासह अयोध्या (Ayodhya Ram Mandir) वारी केली आहे. त्याचे फोटो, व्हिडिओ त्याने सोशल मिडियावरुन (Ayodhya Ram Mandir) शेअर केले आहेत.
 
प्रसाद ओकने पत्नी मंजिरी ओक आणि मुलांसह रामलललाचे दर्शन घेतले. सोशल मिडियावर शेअर केलेल्या व्हिडिओत प्रसादने मुंबई ते अयोध्यापर्यंतचा प्रवासही दाखवला आहे. यापुर्वी अनेक हिंदी कलाकारांनी देखील प्रभू श्रीरामाचे दर्शन अयोध्येत जाऊन घेतले होते.
 

prasad oak  
 
प्रसाद ओक यांच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास 'धर्मवीर २' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. याशिवाय 'महापरिनिर्वाण' हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिनिर्वाण यात्रेला कॅमेऱ्यात कैद करणाऱ्या नामदेव व्हटकर यांची कथा सांगणाऱ्या चित्रपटातही तो व्हटकरांची भूमिका साकारताना दिसणार आहे.
Powered By Sangraha 9.0