अल्पवयीन मुलीवर सद्दामने केला अत्याचार! पोलीसांनी झाडली गोळी

    04-May-2024
Total Views |

Saddam
 
 
बंगळुरू : कर्नाटकच्या धारवाड हुबळी नवानगरमध्ये सद्दाम हुसैन नावाच्या एका आरोपीच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहेत. मागासवर्गीय गरीब मुलीवर बलात्कार प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर POCSO अॅक्ट अंतर्गत कारवाई केली आहे. शुक्रवार, दि. ३ मे रोजी दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर चाकूहल्लाही केला. पोलीसांच्या तावडीतून सुटण्यासाठी पळून जाण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे पोलीसांना त्याच्या पायावर गोळी मारावी लागली.
 
१९ वर्षीय सद्दाम हुसैनवर शाळेत शिकणाऱ्या पीडितेवर बलात्काराचा आरोप आहे. त्याच्यामुळे ती गर्भवतीही राहिली. पोलीस तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीसांनी अटक केली. त्यानंतर पोलीसा ठाण्यातून पसार होण्याचा प्रयत्नही त्याने केला. पोलीस अधिकारी संगमेश बिदिगिनल यांना त्याने जखमी केले. अन्य एका पोलीस कर्मचाऱ्यालाही त्याने जखमी केले. पोलीसांनी एक गोळी हवेत तर दुसरी त्याच्या पायावर चालवली.


 
 
पोलीस उपायुक्त राजीव एम यांनी याबद्दल माहिती दिली आहे. सद्दामवर KIMS या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच तिथेच दोन्ही जखमी पोलीसांवरीह उपचार सुरू आहेत. पीडितेशी मैत्री करत तिचा विश्वास जिंकून घेतला. तिच्यावर जबरदस्ती करून त्याने शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्याने मुलीला धमकावलेही. या घटनेनंतर पोलीस तक्रार दाखल झाली. त्याला एका तासात अटक करण्यात आली आहे. पोलीसांनी अॅट्रोसिटी अंतर्गतही कारवाई केली आहे.
 
पोलीस अधिकारी रेणूका सुकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीसांनी आत्मसंरक्षणासाठी गोळी चालवली. आरोपीची प्रकृती आता स्थिर आहे. पोलीसांना रुग्णालयात अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याची तक्रार दाखल झाली. त्यानंतर एफआयआर दाखल झाली. आरोग्य मंत्री दिनेश गुंडू यांनी याबद्दल गंभीर दखल घेतली आहे. पोलीसांनी योग्य कारवाई केली आहे. जो कायदा तोडेल त्याला गंभीर परिणाम भोगावे लागणार आहेत.