'जुनं फर्निचर' पाहून भारावले प्रेक्षक; विशाल कडणे यांच्यामार्फत खास शोचे आयोजन

    04-May-2024
Total Views |
vishal kadne bhandup
 
मुंबई  : शुक्रवारी भांडुपच्या मॅगनेट माँल येथे 'जुनं फर्निचर' ( june furniture Film ) या चित्रपटाचा स्पेशल शो आयोजित करण्यात आला होता. यावेळी या चित्रपटातील कलाकारही उपस्थित होते. या शोला नागरिकांकडुन भरघोस प्रतिसाद मिळाला. साधारणपणे ४०० नागरिकांनी या शोसाठी हजेरी लावली.
 
संध्याकाळी चार वाजता मॅगनेट मॉलमधील सिनेपोलिस मल्टीप्लेक्स मध्ये शोला सुरुवात झाली. यावेळी या चित्रपटातील मुख्य कलाकार मेधा मांजरेकर, भुषण प्रधान, अनुषा दांडेकर आणि चित्रपटाचे निर्माते यतिन जाधव उपस्थित होते. या कलाकारांनी यावेळी प्रेक्षकांशी आणि दै. मुंबई तरुण भारत शी संवाद साधला. आणि चित्रपटाबद्दल त्यांच्या प्रतिक्रिया जाणुन घेतल्या.


vishal kadne bhandup
 
या चित्रपटातुन जेष्ठ नागरीक आणि त्यांची मुले यांच्यामधील नात्यमधील वास्तव दर्शविण्यात आले आहे. सर्व कुटुंबाने सोबत पहावा असा हा चित्रपट आहे. आजच्या तरुण पिढीच्या डोळ्यात अंजन घालणारा असा हा चित्रपट आहे. याला जेष्ठ नागरीक आणि तरुणांकडुनही फार चांगला प्रतिसाद मिळत आहे.
 
या विशेष स्क्रिनींगचे आयोजन विशाल कडणे यांच्या मार्फत करण्यात आले होते. आजच्या तरुण पिढीचे डोळे उघडावे, आपल्या आई वडिलांच्या समस्या त्यांच्यापर्यत पोहोचाव्या यासाठी आणि चित्रपटातुन दिला गेलेल्या सामाजिक संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा म्हणुन हा अनोखा उपक्रम विशाल कडणे यांच्याकडुन करण्यात आला होता. ज्याला प्रेक्षकांकडुन उत्फुर्त प्रतिसाद मिळाला.