' या ' तारखेला जगातील पहिली बजाज सीएनजी बाईक येणार!

04 May 2024 15:42:49

CNG Bike
 
 
मुंबई: लवकरच जगातील पहिली सीएनजी बाईक येणार आहे. बजाज पल्सर दुचाकीच्या उद्घाटनप्रसंगी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव बजाज यांनी वृत्ताला दुजोरा दिला आहे.१८ जून २०२४ रोजी 'बजाज सीएनजी बाईक 'लाँच होणार आहे. कंपनीने या वृत्ताला अधिकृत पुष्टी दिल्याने लवकरच भारतीय बाजारात ही नवी दुचाकी येणार आहे.
 
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, 'ब्रुझर' असे नाव या दुचाकीचे नाव असणार आहे.११० ते १२५ सीसी या दरम्यान या दुचाकींची क्षमता असणार आहे.कंपनीने या दुचाकीचा ट्रेडमार्क २०१६ मध्येच नोंदणीकृत केला होता. परवडणारी किंमत व जास्ती मायलेज या दुचाकीचे वैशिष्ट्य असणार आहे. आगामी काळात दुसऱ्या कंपन्या देखील सीएनजी बाईक बाजारात आणण्याची शक्यता आहे. या दुचाकीची किंमत ८०००० पासून सुरु होईल असा जाणकारांचा अंदाज आहे.
 
सीएसआर अंतर्गत कंपनी येणाऱ्या काळात ५००० कोटींची गुंतवणूक करणार असल्याची शक्यता आहे. यासंबंधीची प्रसारमाध्यमांशी बोलताना बजाज यांनी याप्रसंगी ही माहिती दिली होती.
 
Powered By Sangraha 9.0