यावर्षी शिक्षकांना ३५ उन्हाळी सुट्ट्या!

04 May 2024 18:52:21
 
School Holidays
 
मुंबई : यावेळी शिक्षकांना ३५ दिवसांच्या उन्हाळी सुट्या मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. येत्या ६ मे पासून तर १४ जूनपर्यंत शाळांना उन्हाळी सुटी लागणार आहे. परंतू, ७ मे रोजी निवडणूकीच्या कामासाठी शिक्षकांना हजर राहावे लागणार असल्याचे बोलले जात आहे.
 
हे वाचलंत का? -  आदित्य ठाकरेंनी घेतली सदानंद कदमांची भेट!
 
याशिवाय १५ जूनपुर्वी इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या फेरपरिक्षा घेऊन निकाल जाहीर करण्याचे आदेशही देण्यात आले आहे. दरम्यान, शालेय विद्यार्थ्यांच्या वार्षिक परिक्षा संपल्या असून निकालही जाहीर झाले आहेत. या वर्षात शिक्षकांना एकूण ७६ सुट्या मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यंदा ६ मे ते १४ जूनपर्यंत शिक्षकांना उन्हाळी सुट्या मिळणार आहेत.
 
 
 
Powered By Sangraha 9.0