अर्भकाला पाचव्या मजल्यावरुन फेकले! QR कोडवरुन लागला आरोपीचा शोध

    04-May-2024
Total Views |

Kerala Police

(Kochi Vidya Nagar Apartment - Photo Courtesy Manorama)
 
कोची : विद्या नगर अपार्टमेंटमध्ये आईनेच आपल्या अर्भकाची इमारतीवरुन फेकून देत हत्या केली. शवविच्छेदन अहवालात बाळाला डोक्याला इजा झाल्याने हत्या झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी तिच्या २३ वर्षे आरोपी आईला ताब्यात घेतली आहे. आरोपी बलात्कार पीडिता असल्याने तिची माहिती उघड करू शकत नसल्याचे पोलीसांनी सांगितले आहे. तिची प्रकृती ठिक नसल्याने तिला एर्नाकुलम रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तिची प्रकृती बरी झाल्यानंतर तिची कोठडी मागण्यात येईल.
 
गर्भवती राहिल्यानंतर तिला मुल नको होते. मुल पाडण्यासाठी तिने इंटरनेटवर बऱ्याच क्लृप्त्या शोधल्या त्यात तिला यश आले नाही. अखेर या मुलापासून सुटका व्हावी म्हणून तिने हे पाऊल उचलले आहे. ३ मे रोजी पहाटे पाच वाजताच्या सुमारास तिने स्वतःच्याच घरी प्रसुती केली. नवजात मुलाच्या तोंडात कापडाचा बोळा कोंडला. बाळाच्या रडण्याचा आवाज होऊ नये यासाठी तिने शाल वापरली. त्यानंतर तिने बाळाला प्लास्टीकच्या पिशवीत गुंडाळले आणि बाल्कनीच्या रस्त्यावरुन फेकून दिले. तिने बाळाचा मृतदेह कुठलेतरी पुरण्याचा विचार केला होता. तेव्हा तिच्या डोक्यात आत्महत्येचाही विचार आला. दरम्यान तिच्या आईने रात्री दरवाजा ठोठावला होता. परंतू तिने दरवाजा उघडला नाही.
 
आई-वडिलांना तिच्या गरोदरपणाची काहीही माहिती नसल्याचा जबाब तिने पोलीसांत नोंदविला आहे. मात्र, पोलीसांनाही त्यांच्या सहभागाचा संशय आहे. त्या संदर्भातील माहिती मिळविण्यासाठी पोलीसांचा तपास सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच तिने जवळच्या शहरातील महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. त्रिशूर येथील एका तरुणाशी ती संपर्कात होती. मात्र, तिने त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचा जबाब नोंदविलेला नाही. दरम्यान रात्री घडल्या प्रकारानंतर सकाळी ८.१५ वाजता शाळेच्या बस ड्रायव्हरला एका ऑनलाईन शॉपिंग कंपनीच्या बॅगमध्ये मृत अर्भक आढळले. त्यानंतर त्याने पोलीसांना पाचारण करण्यात आले.
 
पोलीसांनी या संदर्भातील दिलेल्या माहितीनुसार, मुलीने स्वतः घरातल्या बाथरुममध्ये प्रसुतीची तयारी केली होती. अर्भक आढळल्याची माहिती दिल्यानंतर पोलीसांनी तपास सुरू केला, सकाळी ८.३० वाजता घटनास्थळी पोहोचले. सीसीटीव्हीचा तपास केल्यानंतर सकाळच्या वेळेस वरुन काहीतरी फेकण्यात आल्याचे निष्पन्न झाले. या अर्भकाशेजारी एक ऑनलाईन विक्री करणाऱ्या कंपनीचे प्लास्टीक कव्हर होते. त्यावर असलेल्या क्यू आर कोडच्या मदतीने आरोपीच्या घराचा पत्ता सापडला. "बारकोड स्कॅन केल्यानंतर आम्हाला आरोपीचा पत्ता सापडला, इमारतीच्या पाचव्या मजल्यावर आम्ही पोहोचलो. आम्ही आरोपीची चौकशी केल्यानंतर तिने गुन्ह्याची कबुली दिली", अशी माहिती पोलीसांनी दिली.
 
दरम्यान, केरळ राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने घटनेचा गांभीर्याने तपास सुरू केला आहे. कोची शहर पोलीस आयुक्ताना अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष के. व्ही. मनोजकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार,"नको असलेल्या मुलांसोबत अशी दृष्कर्म होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करतो. त्यांच्या संरक्षणासाठी अनेक सरकारी यंत्रणा आहेत. अम्माथोटील येथे बालगृह आहे तिथे असी मुले सुरक्षित वाढतील.”