Q4 Results: टिप्स इंडस्ट्रीजचा तिमाही निकाल कंपनीला निव्वळ नफा १२७.२ कोटी महसूलात २२ टक्क्यांनी वाढ

कंपनींच्या महसूलात वर्षभरात २९ टक्क्यांनी वाढ

    04-May-2024
Total Views |

Tips
 
 
 
मुंबई: टिप्स (Tips) या म्युझिक लेबल कंपनीने आपल्या चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला आहे.कंपनीच्या महसूलात इयर ऑन इयर बेसिसवर २९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आर्थिक तिमाहीत कंपनीच्या महसूलात २२ टक्क्याने वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेतील ५२ कोटींच्या तुलनेत यंदा ६३.३ टक्क्यांचा महसूल मिळाला आहे. कंपनीला २५.८ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे मागील आर्थिक वर्षाच्या तिमाहीत कंपनीला १८.३ कोटींचा निव्वळ नफा झाला होता.
 
कंपनींच्या उलाढालातील उत्पन्नात (Operating Revenue) मध्ये २९ टक्क्यांनी वाढ होत उत्पन्न २४१.६ कोटीवर पोहोचले आहे. मागील वर्षात हे महसूल १८६.८ कोटी होते. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये निव्वळ नफा ६६ टक्क्याने वाढत १२७.२ कोटींवर पोहोचले आहे. २०२३ मध्ये निव्वळ नफा ७६.५२ कोटीवर होता.
 
कंपनीने यावर्षी १७९ गाणी प्रदर्शित केली होती. त्यातील १२३ गाणी चित्रपटातून उर्वरित ५६ गाणी अल्बममार्फत प्रसिद्ध करण्यात आली होती. टिप्स इंडस्ट्रीजचे एकूण सबस्क्राईबर ९७ दशलक्ष होते. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत या आकडेवारीत वाढ होऊन ४७.८ अब्जावर सबस्क्राईबर झाले आहेत. कंटेटवर केलेल्या खर्चात मागील वर्षाच्या तुलनेत वाढ झाली आहे. ही संख्या १९ कोटींवरून वाढत २३.९ कोटींवर पोहोचली आहे.