Q4 Results: डाबर इंडियाचा तिमाही निकाल जाहीर, कंपनीला ३५० कोटींचा निव्वळ नफा

संचालक मंडळाने प्रत्येक समभागावर २.७५ रुपयांचा लाभांश सुचवला

    04-May-2024
Total Views |

Dabur India
 
 
मुंबई: डाबर इंडियाचा तिमाही निकाल जाहीर झाला आहे. कंपनीच्या निव्वळ नफ्यात १६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या ३०१ कोटींच्या तुलनेत यंदा ३५० कोटींचा नफा झाला आहे. कंपनीच्या उलाढालीतून मिळालेल्या महसूलात (Revenue from Operations) इयर ऑन इयर बेसिसवर ५ टक्क्यांची वाढ होत २८१५ कोटींचा नफा झाला आहे.
 
संपूर्ण वर्षात एकत्रितपणे निव्वळ नफ्यात ७.९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या १७०७ कोटींच्या तुलनेत यावेळी १८४३ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. कंपनीच्या एकूण विक्रीत ५.१ टक्क्यांनी वाढ होत विक्री २८१४.६ कोटींवर पोहोचली आहे. कंपनीच्या इतर उत्पन्नात ६.७ टक्क्यांनी वाढ झाली असुन ते उत्पन्न १२८.९ कोटी मिळाले आहे.
 
कंपनीच्या इतर खर्चापूर्वीचा नफ्यात (PBIDT) मध्ये १२.२ टक्क्यांनी वाढ होत नफा ५९३.३ कोटींवर पोहोचला आहे. कंपनीच्या महसूलात ७.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीचे एकत्रित (Consolidated) मार्जिन मध्ये १६.६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीच्या ओरल केअर (Oral Care) व्यवसायात कंपनीला वाढ झाली आहे. या व्यवसायात एकूण २२ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर टूथपेस्ट विक्रीत २३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
 
हजमोला व्यवसायात कंपनीला १६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.होम केअर सेगमेंटमध्ये ७.५ टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीने निकाल जाहीर करताना, कंपनीच्या संचालक मंडळाने प्रति समभाग २.७५ रुपयांचा लाभांश (Dividend) सुचवला असून याबाबतचा अंतिम निर्णय भागभांडवलधारकांच्या बैठकीत होणार आहे.