मुंबई तरुण भारत शनिवार विशेष: रोटी कपडा मकान व एंटरटेनमेंट!

    04-May-2024
Total Views |

Entertainment
 
मोहित सोमण
 
गेले काही वर्षांत लोकांची पसंती बदलली आहे ‌रोटी, कपडा, मकान, मोबाईल आणि आता 'एंटरटेनमेंट' ही जीवनाची जीवनावश्यक जीवनसत्त्वे बनली आहे. मुख्यतः मनोरंजन आयुष्याचा मुलभूत हिस्सा बनला आहे. मर्यादित मिळणाऱ्या आयुष्यात प्रत्येकाला करमणूक हवी असते कोणाला मनोरंजन नको असते ? कामकाज हे प्रत्येकाच्या पाचवीलाच पुजलेले आहे.
 
जगण्यासाठी चटणी भाकर तर प्रत्येक जण कमावतो पण कंटेट ही नशा आयुष्य फुलवतो! असे म्हणायला हरकत नसेल.अशाच करमणुकीची महती सांगणारा अहवाल समोर आला आहे. सीएमएस कंझमशन रिपोर्ट २०२४ या अहवालात मनोरंजनाची महती सांगितली गेली आहे. मुलभूत सुविधा व्यतिरीक्त दिवसेंदिवस लोकांच्या मुलभूत उपभोगात बदल होत आहेत. डिजिटल मिडिया काळात लोकांची ' जाणून' घेण्याची भूक गुगलने वाढल्याने करमणूक अथवा कंटेंट पाहण्याची संख्या वाढत आहे. दुसरीकडे महागाई नियंत्रणात आल्यानंतर व लोकांच्या वैयक्तिक खर्चात वाढ झाल्यामुळे कंटेंट पहायला लोक महत्व अथवा प्राधान्य देऊ लागले.
 
याच निरिक्षणाची नोंद करत या सर्व्हेत अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत ज्याची दखल घेणे महत्वाचे आहे. प्राथमिकता आर्थिक वर्ष २०३० पर्यंत घरगुती कंझमशनमध्ये (उपभोगात)जीडीपीतील ६० टक्के हिस्सा कंटेंटवर खर्च होण्याची शक्यता वर्तवली आहे. इतर कुठल्याही अर्थव्यवस्थतेतील तुलनेत भारतात ही वाढ प्रचंड प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. या अंदाजाने भारतीय बाजारात जवळपास ४ ट्रिलियन डॉलर्सची उलाढाल भारतीय अर्थव्यवस्थेत फक्त 'कंटेट' मार्फत होऊ शकते असे अनुमान निघते.
 
भारतीय बाजारपेठेत गेल्या १० वर्षात मोठ्या प्रमाणात मध्यमवर्गीय व उच्च मध्यमवर्गीय यांची संख्या वाढल्याने त्यांची क्रयशक्ती वाढली याशिवाय तुलनेत दुप्पट वेगाने तंत्रज्ञानात वाढ झाल्याने कंटेंटची सहज उपलब्धता शक्य झाली. या एकत्रित परिणामाने कंटेट इंडस्ट्री मोठ्या वेगाने वाढत आहे. या अहवालात म्हटल्याप्रमाणे आगामी काळात आर्थिक वर्ष २०२७ पर्यंत भारत ही ३ क्रमांकाची अर्थव्यवस्था होऊ शकते. याचा परिणाम कंझमशनमध्ये वाढ झाल्याने पुन्हा घरगुती मागणीत वाढ झाल्याने पुरवठा वाढवण्यासाठी कंपनींच्या उलढाली वाढू शकतात. तंत्रज्ञानाच्या युगात अनेक असंभव गोष्टी सहज शक्य झाल्याने अनेक कंटेंट कंपन्या रिसर्च डेव्हलपमेंटमध्ये खर्च वाढवू लागल्या आहेत. याच नेमके उदाहरण म्हणजे भारतातील लक्झरी वस्तूंचे वाढणारे मार्केट हे आहेत.मुलभूत सेवांपेक्षा लोकांनी आपला मोर्चा विलासी उत्पादनाकडे वाळल्यानंतर त्यात कंटेंट हा मोठा विभाग आहे.
 
कंटेंट पर्यंत पोहोचण्यासाठी लागणारे लॉजिस्टिकस पुरवठा अंतर्भूत करण्यात आल्यामुळे घरबसल्या मोठ्या प्रमाणात मनोरंजनाचा उपभोग व्यक्ती घेऊ शकतो. युपीआय व्यवहारात मोठी वाढ झाल्याने सहजच हवे असलेले उत्पादन सेकंदात माणूस विकत घेऊ शकतो. सीएमएस अहवालात म्हटल्याप्रमाणे, आर्थिक वर्ष २०२३ मध्ये प्रथम क्रमांकावर मागणी असलेल्या उत्पादनात पेट्रोल होते दोन क्रमांकावर मिडिया एंटरटेनमेंट तिसऱ्या रेल्वे चौथ्या क्रमांकावर विमान सहाव्या क्रमांकावर चप्पल होते परंतु आर्थिक वर्ष २०२४ मध्ये परिस्थिती बदलत प्रथम क्रमांकावर कंटेंट म्हणजेच मिडिया एंटरटेनमेंटने प्रथम क्रमांक पटकावला आहे. दुसऱ्या क्रमांकावर एफएमसीजीचा नंबर लागतो. यातूनच चित्र स्पष्ट होत आहे. मुख्यतः हा बदल का होत आहे तेही जाणून घेणे महत्वाचे आहे.
 
नव्वदच्या दशकात चित्रपट, संगीत, टीव्ही या चैनीच्या गोष्टी होत्या ज्याला फारसे महत्व दिले नव्हते. काळ बदलल्यावर लोकांच्या गरजा बदलत गेल्या परिणामी लोकांनी भूक शमविण्यासाठी गुगलचा सहारा घेतला. आज मनोरंजन हे प्राथमिकतेचे लक्षण आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये मिडिया एंटरटेनमेंटवरील खर्चात भारतीय बाजारात २९.३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.गेल्या २ वर्षात हा खर्च १०० टक्क्यांनी थेट वाढला आहे. वेगवेगळ्या प्रकारचा ओटीटी कंटेंट, पर्सनल टच देणारा फिल गुड कंटेट यामुळे फावल्या वेळात कंटेंट ही लोकांची गरज झाली आहे.
 
मोठमोठ्या कंपन्यानी कंटेंट क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर स्पर्धा स्वभाविकपणे वाढली. स्पर्धेचे रुपांतर जीवघेण्या स्पर्धेत सुरु झाले. त्यावर अवलंबून असणाऱ्या टेलिकॉम, इंटरनेट आदी क्षेत्रात धोरणात्मक बदल होऊ लागले. डेटा वापरण्याच्या पद्धतीत खर्चात तसेच सवयीत फरक पडू लागला. तुलनात्मक दृष्ट्या माध्यमातून प्रत्यक्ष संवाद कमी होत दृक श्राव्य माध्यमाचा उदय झाला. जागतिक पातळीवरील समाजभान बदलत असताना सामाजिक आर्थिक, शैक्षणिक स्थितीत बदल झाल्याने कंटेंटचा आशय बदलत आहे.
 
लोकांची बदललेली चव पाहत कंटेंट येताना माणूस खिशातून दोन रुपये अधिक खर्च करू लागला आहे. सोशल मीडियावर व्यक्त होताना व्यक्ती तंत्रज्ञानाबाबत चर्चा करत असतात. त्या चर्चेची बसल्या बसल्या अँपच्या माध्यमातून एका बटणावर व्यक्ती कंटेंट शोधतो.हीच इको सिस्टीम भविष्यात खूप मोठी ठरणार आहे. ओटीटी आल्यानंतर लोकांना वाटू लागले की सिनेमागृहांची जागा ओटीटी घेणार असे विशेषतः कोविड काळात वाटू लागले असले तरी प्रत्यक्षात तसे झाले नाही.किंबहुना पुन्हा सिनेमागृहांचे पुनवर्सन होताना दिसत आहे.ओटीटी बरोबर प्रत्यक्ष सिनेमातगृहात जाऊन सिनेमा बघणारा प्रेक्षकवर्ग आहे. याचा अर्थ कंटेंटची मागणी इतकी आहे की माध्यम कुठलेही असो त्याची मागणी संपणार नाही काळानुरूप कमी जास्त होऊ शकते पण बंद होऊ शकत नाही.
 
कंटेंटमध्ये वाढ होताना प्रेक्षकवर्गही वाढत आहे.खर्चात वाढ होत असताना पुन्हा एकदा बाजारात कंटेंट परिवर्तन होत आहे. माध्यम वाढता वाढता लोकांच्या आवडीनिवडीतही बदल होत आहे. परिणामी भविष्यात उलाढाल वाढली महसूल वाढला अथवा कमी झाला तरी कंटेंटचे महत्व शाबूत असणार आहे. किंबहुना त्यावर खर्चात याहून वाढ होणार आहे. मुलभूत खर्चामध्ये कंटेंटचा समावेश झाल्याने आर्थिक नियोजन पद्धत समाजातील बदलू शकते. कंटेंट हे केवळ लक्झरी आहे की नाही यापेक्षा व्यापक नजरेने याकडे पाहण्याची खरी गरज आहे.
 
कंटेट ही सेवा क्षेत्रातील महत्वाची भूमिका पार पाडणार आहे. शेती, औद्योगिक उत्पादन, तंत्रज्ञान, याव्यतिरिक्त सेवा क्षेत्राचे योगदान वाढल्याने कंटेंट बेस सुविधेतही लक्षणीय वाढ होऊ शकते.अहवालातून लोकांचा कंटेंट वरील खर्चाचा आवाका वाढल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. याआधीही अनेक अहवालात स्पष्ट झाला आहे. आता प्रश्न एकच उरतो कंटेट वरील खर्च वाढत असताना समाज कुठल्या दिशेने जाणार व त्याचे प्रतिबिंब कुठल्या परिपेक्षात कंटेट मध्ये दिसणार हे आता सांगण कठीण आहे. एक गोष्ट मात्र सांगणे सोपे आहे ते म्हणजे ' रोटी कपडा मकान आणि ' एंटरटेनमेंट'