हनुमंताची ४० फूट उंच मूर्ती ऑकलंडमधील विशेष आकर्षण ठरणार

    04-May-2024
Total Views |

Auckland Hanuman Statue
(Hanuman Statue Auckland)
मुंबई (प्रतिनिधी) : न्यूझीलंडच्या हिंदू ऑर्गनायझेशन टेंपल्स अँड असोसिएशन फोरमने ऑकलंड येथील भारतीय मंदिरात काही दिवसांपूर्वी हनुमान जयंतीनिमित्त एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात मोठ्या संख्येने हिंदू सहभागी झाले होते. यावेळी युवा केंद्राच्या स्थापनेसोबतच ऑकलंडच्या हद्दीत हनुमंताची ४० फूट उंचीची मूर्ती बसवण्याचा निर्णय कार्यक्रमात घेण्यात आला.

हे वाचलंत का? : पाकिस्तानहून आलेले २५० रामभक्त श्रीरामललाचरणी लीन

हिंदू ऑर्गनायझेशन टेंपल्स अँड असोसिएशन फोरम, न्यूझीलंडचे समन्वयक विनोद कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार १८ ते ३५ वयोगटातील तरुणांना धर्म आणि संस्कृतीची माहिती देऊन त्यांचा सर्वांगीण विकास करणे हा युवा केंद्राचा मुख्य उद्देश आहे. याठिकाणी समुपदेशन, नेतृत्व विकास कार्यक्रम, कला आणि सांस्कृतिक उपक्रमांसह युवकांसाठी खेळ आणि मनोरंजनाच्या सुविधा असतील. वैयक्तिक विकासाला चालना देणे, नेतृत्व कौशल्ये वाढवणे आणि तरुणांमध्ये समुदायाची मजबूत भावना वाढवणे यांचा यात मुख्यतः समावेश आहे.

हे केंद्र केवळ सांस्कृतिक अभिमानाचे स्रोत नाही तर एक पर्यटन स्थळ आणि शैक्षणिक संसाधन देखील असेल. तसेच शाळांना एक दिवसीय सहलीसाठी सुद्धा आमंत्रित करेल. या एकात्मिक प्रकल्पाचे उद्दिष्ट केवळ तरुणांनाच नव्हे तर समाजाच्या सर्वांगीण कल्याणासाठी आणि चैतन्यशीलतेमध्ये योगदान देणे हा आहे. संपूर्ण योजना तीन ते पाच वर्षांत पूर्ण होईल.