गौतम सिंघानिया यांची कार्यकारी संचालक पदी फेरनिवड, कंपनीने …..

पाच वर्षाच्या मुदतीसाठी गौतम सिंघानिया यांची फेरनिवड

    04-May-2024
Total Views |

gautam singhania
 
 
मुंबई: एक्सचेंज फायलिंगमध्ये माहिती दिल्याप्रमाणे पुन्हा एकदा पाच वर्षाच्या मुदतीसाठी गौतम सिंघानिया यांची रेमंड कंपनीच्या कार्यकारी संचालकपदी निवड झाली आहे. १ जुलै २०२४ पासू़न त्यांचा नवा कार्यकाल सुरु होणार आहे. गेले काही दिवस विविध कारणांमुळे चर्चेत असणारी रेमंड कंपनीने अंतर्गत बैठकीत हा मोठा निर्णय घेतला आहे.
 
गौतम सिंघानिया यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण मुंबईत पूर्ण केले होते. सप्टेंबर २००० मध्ये त्यांनी कार्यकारी संचालक पदावर येत कंपनीची सूत्र हाती घेतली होती. कंपनीच्या महत्वपूर्ण निर्णयात त्यांचा महत्वपूर्ण वाटा होता.रेमंड कंपनीची पुनर्रचना करण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. टेक्स टाईल व्यतिरिक्त कंपनीचे सिमेंट, स्टील, सिंथेटिक या व्यवसायाची सूत्र त्यांनी आधी पार पाडली आहे.
 
कंपनीच्या माहितीपत्रकारात दिलेल्या माहितीनुसार, 'सिंघानिया आणि .. यांच्या नेतृत्वाखाली गटाने प्रचंड प्रगती केली आहे.कंपनीला महत्वपूर्ण दर्जा प्रदान करण्यात सिंघानिया यांचा मोठा सहभाग राहिला आहे. नवीन उत्पादने बाजारात आणण्यासाठी सिंघानिया यांनी यशस्वीपणे प्रयत्न केले त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने मोठी प्रगती केली असल्याचे' म्हटले आहे.
 
कंपनीच्या संचालक मंडळातून सिंघानिया यांची पत्नी नवाझ मोदी सिंघानिया यांची नुकतीच हकालपट्टी करण्यात आली होती. रेमंड ग्रुप, रेमंड कनज्यूमर केअर, स्मार्ट अँडव्हायजरी व फिनसर्व्ह या तीन आस्थापनेवरील संचालक मंडळावरून त्यांना काढण्यात आले होते.