आदित्य ठाकरेंनी घेतली सदानंद कदमांची भेट!

04 May 2024 18:12:37

Aditya Thackeray & Sadanand Kadam 
 
रत्नागिरी : उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी नुकतीच सदानंद कदम यांची भेट घेतली आहे. खेडमधील साई रिसॉर्ट येथे ही भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. सदानंद कदम यांच्यावर ईडीची कारवाई झाली आहे. त्यानंतर आता आदित्य ठाकरेंनी त्यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे.
 
हे वाचलंत का? -  "उद्धव ठाकरे पुन्हा मोदींसोबत जाणार!"
 
सदानंद कदम हे उबाठा गटाचे नेते अनिल परब यांचे निकटवर्तीय मानले जातात. ते शिवसेनेच्या रामदास कदम यांचे भाऊ आहेत. परंतू, त्यांच्यात कौटुंबिक वाद असल्याचेही बोलले जाते. दापोली साई रिसॉर्ट प्रकरणात सदानंद कदम यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, आता आदित्य ठाकरेंनी खेडमध्ये सदानंद कदम यांची भेट घेतली आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0