अदानी समुह आता फिलिपाईन्समध्ये!

04 May 2024 14:23:55

Adani Philippines
 
 
मुंबई: अदानी पोर्टस व स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (APSEZ) ने आपले पाऊल फिलिपाईन्स देशात ठेवले आहेत. तिकडील मूलभूत सुविधा उभारण्यासाठी अदानी समुहाने मोठे पाऊल उचलले आहे. भारतातील सर्वात मोठे पोर्ट ऑपरेटर अदानी समुहाने फिलिपाईन्समध्ये मोठी गुंतवणूक करत २५ मीटर लांब पोर्ट बांधणार असल्याचे फिलिपाईन्सचे अध्यक्ष फर्डिनांड मार्कोस यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे.
 
यासाठी नुकतीच अदानी समुहातील कंपनी अपसेझ (APSEZ) कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक करण अदानी यांनी फिलिपाईन्सच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली आहे. २ मे तारखेला ही भेट झाली असुन यात गुंतवणूकीच्या विषयावर चर्चा झाल्याचे समजते आहे.
 
याविषयी बोलताना करण अदानी यांनी फिलिपाईन्सच्या राष्ट्राध्यक्षांना उद्देशून म्हटले आहे की, 'महामहिम, खाजगी क्षेत्र म्हणून, आम्ही नेहमी स्थिरतेची अपेक्षा करतो. नियमनातील स्थिरता आणि आम्ही ज्या वातावरणात काम करत आहोत त्या वातावरणात स्थिरता. हेच तुम्ही म्हणालात, तुम्ही देत आहात,'अदानी यांनी गुरुवारी मार्कोसला सांगितले.
 
कंपनी फिलिपाईन्स देशात पोर्ट विकासासाठी पुढाकार घेत असून कंपनीला २५ मीटर रुंद पोर्ट बांधायचे आहे ज्यामध्ये पनामाएक्स वेसल उभारण्याची क्षमता असणार आहे. यावर फिलिपाईन्स राष्ट्राध्यक्षांच्या बैठकीत त्यांनी पाठिंबा देऊन 'फिलिपाईन्स जागतिक स्पर्धेत उभे राहणार असून पर्यटन, व्यवसाय भेटी, शेती उत्पादन व शेती उत्पादनाची दळणवळण या मूलभूत सुविधा उभारण्यासाठी पुढाकार घेत आहे.'असे म्हटले आहे.
 
नुकताच कंपनीने आपला चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला ज्यामध्ये कंपनीला २०१४.७७ कोटींचा निव्वळ नफा झाला होता. कंपनीच्या एकूण उत्पन्नातही वाढ झाली असून हे उत्पन्न ७१९९.९४ कोटींवर पोहोचले आहे. भारताच्या एकूण कार्गो इंडस्ट्रीतील २७ टक्के वाटा अदानी समुहाच्या अपसेझ कंपनीचा असून देशातील कंटेनर कार्गोतील ४४ टक्के वाटा समुहाचा आहे.
 
Powered By Sangraha 9.0