नवी दिल्ली : कन्याकुमारीतील स्वामी विवेकानंद शीला स्मारकातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ध्यानाचा आज अखेरचा दिवस आहे. लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्याचे मतदान आज होणार आहे. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ध्यानधारणादेखील आज सायंकाळी पूर्ण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्याचा प्रचार संपल्यानंतर म्हणजे गुरुवारी सायंकाळपासून कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद शीला स्मारकात दाखल झाले होते.
हे वाचलंत का? - लोकसभेसाठी मतदान अंतिम टप्प्यात, एक्झिट पोल वर्तवणार विजयाचा अंदाज
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शीला स्नारकामध्ये स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस अभिवादन करून स्मारकातील ध्यान मंडपामध्ये आपल्या ध्यानास प्रारंभ केला होता. त्यानंतर शुक्रवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूर्यास अर्घ्य अर्पण केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवी वस्त्रे परिधान केली आहेत. हाती रुद्राक्षाची माळ घेऊन ओंकार जप करून पंतप्रधान नरेंद्र मोदी ध्यानस्थ आहेत. यादरम्यान ते नारळपाण्याचे सेवन करणार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडूतील कन्याकुमारी येथील 'विवेकानंद रॉक मेमोरियल' येथे ४५ तासांच्या ध्यानात व्यस्त आहेत. यावेळी त्यांनी भगवे कपडे परिधान केले असून उगवत्या भगवान भास्करला जल अर्पण केले आणि स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्यासमोर बसून ओंकाराच्या नादात ध्यान केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी जपमाळ लावून जप करताना दिसत आहेत. भारताच्या दक्षिणेकडील भागात असलेल्या कन्याकुमारी येथून सूर्योदय आणि सूर्यास्ताचे दृश्य अतिशय विलोभनीय आहे.