अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष हश-मनी केसमध्ये दोषी! ट्रम्प निवडणूक लढवतील का?

31 May 2024 17:38:43
donald trump hush money case



नवी दिल्ली :    अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हश-मनी केसमध्ये दोषी ठरविण्यात आले आहे. २०१६च्या निवडणुकीच्या निकालावर परिणाम करण्यासाठी एक गुन्हेगारी हश-मनी स्कीम लपवल्याबद्दल ट्रम्प यांना न्यूयॉर्कच्या ज्युरीने त्यांना दोषी ठरविले आहे. हश-मनी प्रकरणात दोषी आढळल्याने ट्रम्प निवडणूक लढवू शकतील का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
दरम्यान, अमेरिकन न्यायालयाने ट्रम्प यांना ३४ प्रकरणात दोषी ठरवले असून न्यायालयात खटला दाखल झाल्यापासून ट्रम्प यांनी स्वतःला निर्दोष म्हणून जाहीर केले होते. त्यांच्यावर निवडणूक निकालात फेरफार करण्याचा कट रचल्याचा आरोप, लैंगिक शोषण आणि लाचखोरी सारख्या प्रकरणांचा समावेश आहे. आता न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर हे आपल्याविरोधात षडयंत्र असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे.


हे वाचलंत का? -   चीनचा खलिस्तानी प्रोपगंडा पसरवण्यात हातभार; मेटाच्या कारवाईत उघड!


विशेष म्हणजे २०२० ची निवडणूक उलथवून टाकण्याच्या त्यांच्या प्रयत्नांवरील फेडरल फौजदारी खटल्यात ट्रम्प यांनी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयालात प्रतिवाद केला होता. तसेच, या खटल्यातील अध्यक्षीय पदाकरिता दावा ऐकून घेण्यास यश मिळविले असून खटला चालवण्यास कोठेही तयार नसल्याचे म्हटले आहे.

जानेवारीमध्ये, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्षीय पदाकरिता दावा ऐकण्यास सहमती दर्शविली आणि केसला अनिश्चित काळासाठी विराम दिल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांना हश-मनी केसमध्ये दोषी ठरविण्यात आले आहे. ज्या कायद्यातंर्गत त्यांच्यावर खटला भरण्यात आला आहे, त्यात कमी शिक्षा असून दंडाची रक्कम पण अधिक नसेल.


काय असेल शिक्षा?

माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाने दोषी ठरविले असून अद्याप न्यायालयाने शिक्षा सुनावलेली नाही. याप्रकरणात दि. ११ जुलै रोजी सुनावणी होणार असून त्यादिवशी शिक्षा ठोठाविण्यात येईल. अमेरिकन कायद्यानुसार, ट्रम्प यांना ४ वर्षांपर्यंतची शिक्षा होण्याची दाट शक्यता आहे. रिपब्लिकन पक्षाच्या अधिवेशनापूर्वीच शिक्षेचा निकाल येणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, दि. १५ जुलै रोजी पक्षाचे अधिवेशन होत असून त्याच्या चार दिवसाआधी काय शिक्षा असेल, हे स्पष्ट होईल. विशेष म्हणजे याच अधिवेशनात ट्रम्प यांच्या उमेदवारीची पक्ष अधिकृत घोषणा करणार आहे. दि. ०५ नोव्हेंबर रोजी अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. त्यावर या शिक्षेचा थेट परिणाम दिसून येईल.




Powered By Sangraha 9.0