नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमधील अखनूर भागात बस खोल दरीत कोसळून २२ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत ६९ जण जखमी झाले असून बसमध्ये एकूण ९० हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. सदर अपघातात आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला असून ४० हून अधिक जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुर्घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींपैकी २१ जणांची ओळख पटली आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशातील हाथरस आणि हरियाणातील कुरुक्षेत्र येथून भाविकांना घेऊन जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील पौनी भागातील शिव खोरीकडे जाणारी बस १५० फूट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समोर आले आहे. जखमींना उपचारासाठी जीएमसी जम्मूमध्ये दाखल करण्यात आले आहे.
हे वाचलंत का? - अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष हश-मनी केसमध्ये दोषी! ट्रम्प निवडणूक लढवतील का?
गुरुवारी अखनूर जिल्ह्यातील चौकी चोरा पट्ट्यातील तुंगी-मोर येथे हा अपघात झाला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, बस सुमारे १५० फूट खोल खड्ड्यात पडल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले की, UP81CT-4058 क्रमांक असलेली बस दुपारी साडे बाराच्या सुमारास खड्ड्यात पडली.
या अपघातात २२ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ५३ जण जखमी झाले आहेत. ही बस उत्तर प्रदेशातील हातरस येथून भाविकांना जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील पौनी भागातील शिव खोरी येथे घेऊन जात होती आणि त्यानंतर बस माता वैष्णोदेवीकडे जाणार होती.