विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या उत्सब कुमारवर कट्टरपंथींचा हल्ला!

31 May 2024 15:53:45
Utsab Kumar Gyan attack

नवी दिल्ली : बांगलादेशातील बंगबंधू शेख मुजीबुर रहमान विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या उत्सब कुमार ज्ञान या विद्यार्थ्याला ईशनिंदा केल्याच्या आरोपावरून कट्टरपंथींनी बेदम मारहाण केली. उत्सबने सोशल मीडिया ग्रुपवर प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात अपमानास्पद पोस्ट शेअर केली आणि नंतर ती डिलीट केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

दरम्यान एका हिंदू विद्यार्थ्यांने ईशनिंदा केल्याचे कळल्यावर दि. २६ मे २०२४ रोजी विद्यापीठातील कट्टरपंथी विद्यार्थ्यांनी त्याला बेदम मारहाण केली आणि प्रेषित मोहम्मद यांची 'मस्करी' केल्याचा गुन्हा कबूल करण्यास भाग पाडले. यानंतर कट्टरपंथींनी पीडित तरुणाला विद्यापीठातील निरीक्षक मोहम्मद कमरुझमान यांच्या कार्यालयात नेले आणि तिथे त्याला लेखी कबुली देण्यास भाग पाडले.
उत्सबने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला पुन्हा त्याच जमावाने मारहाण केली आणि नंतर बांगलादेशच्या ढाका विभागातील गोपालगंजमधील पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले.
 
दरम्यान वृत्तसंस्थेने दिलेल्या माहिनुसार, गंभीर जखमी झाल्यामुळे उत्सबला गोपालगंज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना खुलना मेडिकल कॉलेज हॉस्पिटल आणि नंतर ढाका मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. दरम्यान उत्सबवर हल्ला करणाऱ्या आरोपींनी त्याच्याविरुद्ध कठोर कायदेशीर शिक्षा आणि बंगबंधू शेख मुजीबुर रहमान विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठातून कायमची हकालपट्टी करण्याची मागणी केली. 
 
Powered By Sangraha 9.0