शेअर बाजार अपडेट: शुक्रवारची सुरूवात वाढीत मात्र अस्थिरतेचे सावट कायम सेन्सेक्स ११७.१८ व निफ्टी २१.८५ अंशाने वधारला

31 May 2024 11:25:45

Stock Market
 
 
मुंबई: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात ओझरती वाढ झाली आहे. सतत चार वेळा बाजार घसरल्यानंतर पुन्हा एकदा बाजारात किंचित का होईना वाढ झाली आहे. बाजारातील पहिल्या सत्रात वाढ झाल्याने गुंतवणूकदारांचा आशा पल्लवित झालेल्या असण्याची शक्यता आहे. सेन्सेक्स सकाळी ११ वाजता ११७.१८ अंशाने वाढत ७४००९.०६ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक २१.८५ अंशाने वाढत २२५१०.५० पातळीवर पोहोचला आहे.
 
सेन्सेक्स बँक निर्देशांकात १११.९२ अंशाने घट होत ५५४९१.९३ पातळीवर पोहोचला आहे, निफ्टी बँक निर्देशांक ५.९५अंशाने वाढत ४८६८८.३० पातळीवर पोहोचला आहे. बीएसई (BSE) मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.४१ व ०.१९ टक्क्यांनी घट झाली असून एनएसई (NSE) मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.४१ व ०.४६ टक्क्यांनी घट झाली आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.
 
क्षेत्रीय निर्देशांकात सर्वाधिक वाढ निफ्टी रिअल्टी (१.३३%), कनज्यूमर ड्युरेबल्स (०.४६%), मेटल (०.३८%),ऑटो (०.५१%) समभागात झाली आहे तर सर्वाधिक नुकसान मिडिया (१.२४%), फार्मा (०.७४%), पीएसयु बँक (०.८९%),मिडस्मॉल हेल्थकेअर (१.०६%) समभागात झाले आहे.
 
चार दिवसांच्या घसरणीनंतर बाजारात वाढ होताना दिसत असली तरी मिडकॅप स्मॉलकॅपमध्ये होणारी घसरण, बँक निर्देशांकात होणारी चढउतार व बाजारातील निवडणूक निकालापूर्वी वीआयएक्सची अस्थिरता यामुळे बाजारातील Volatility टिकून आहे. त्यामुळे बाजारात अस्थिरतेचे आवाहन आहे. जूनच्या सुरुवातीला अमेरिकन जीडीपी, पीसीएचे  येणारे आकडेवारी आल्यानंतर त्याचा आशिया व भारतीय बाजारात काय परिणाम होतो ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
 
सकाळच्या सत्रात कुठले शेअर्समध्ये वधारले अथवा घसरले ?-
 
BSE -
 
वधारले - अदानी एंटरप्राईज (३.२४%), एम अँड एम (२.६९%)0 बजाज फायनान्स (१.८३%)फाईव स्टार बस (२.६८%) अदानी एनर्जी (१.९३%) एलटी (१.७४%)
 
घसरण - डिवीज - (१.७६%), भारती एअरटेल (१.२५%) बीपीसीएल (१.१५%), सिप्ला (१.०८%), राजेश एक्सपोर्ट (४.८९%), सनटेक रियल्टी (१.९४%)
 
NSE -
 
वधारले - अदानी एंटरप्राईज (३.२४%), एम अँड एम (२.६९%), बजाज फायनान्स (१.८३%), श्रीराम फायनान्स (१.७५%), प्रज इंडस्ट्रीज (५.३१%) बिकाजी फूड (७.४९%)
 
घसरले- डिवीज (१.७६%), भारती एअरटेल (१.२५%), बीपीसीएल (१.१५%) सिप्ला (१.०८%), वेलस्पून (८.३९%) शिंडलर (५%)
 
Powered By Sangraha 9.0