पंढरपूर विठ्ठल- रुक्मिणीमंदिरात आढळले भुयार

31 May 2024 16:21:10

Pandharpur Vithanl Rukhmini Temple


मुंबई :   लाखो हिंदू भाविकांच अराध्य दैवत असलेलं क्षेत्र ‘पंढरपूर’ याच पंढरपूरमधील विठ्ठल- रुक्मिणीच्या मंदीरात दरवर्षी हजारो भाविक दर्शनासाठी येतात. तर याच मंदिराच्या सुशोभिकरणाच्या दरम्यान विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये आता एक भूयार सापडले आहे. तसेच हे भुयार सात ते आठ फुटाचे असल्याचे आढळले आहे. याच भूयाराच्या आत मध्ये देवाची एक मुर्ती देखील असल्याची माहिती समोर आली आहे. हे भुयार मंदिर परिसरातील कान्होपात्रा मंदिराजवळ सापडलं आहे.

हे मंदीर एक प्राचीन काळातील मंदीर म्हणून देखील या मंदिराची एक विशिष्ट अशी ओळख आहे. तसेच सध्या या मंदीराची चौखांबी, गाभारा,व रुक्मिणी मातेचा गाभारा येथे पुरातत्व विभागाच्या देखरेखेखाली या गाभाऱ्याचे काम सुरु आहे. तसेच संपूर्ण मंदिराच्या देखील सुशोभिकरणाचे काम चालु आहे.

तसेच याची संपूर्ण माहिती मंदिर समितीचे मुख्याधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे. तसेच आता पुरातत्व विभागाचे आधिकारी देखील याची पाहणी करायला येणार आहेत. ही बातमी भाविकांसाठी अत्यंत आनंद देणारी बातमी आहे. तसेच या भुयारामुळे आता पुरातन काळातील काही माहिती देखील समोर येण्याची शक्यता आहे. व आता खऱ्या अर्थाने हे पंढरपुरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदीर प्राचीन मंदीर म्हणून पुन्हा एकदा ओळखले जाणार आहे.


Powered By Sangraha 9.0