१२ वर्षीय विद्यार्थीनीचे टॅक्सीचालकाने केले शोषण

    03-May-2024
Total Views |

Jangiwada Police STN



जयपूर : राजस्थानच्या पाली येथून १२ वर्षीय एका पीडितेचे शोषण केल्याची घटना उघडकीस आली आहे. टॅक्सी चालक हाजी मुहम्मदने सातत्याने एक महिना तिचे शोषण करत राहिला. मुलीने वैतागून आपल्या घरच्यांना ही गोष्ट सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. याबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, पाली येथील शाळेत जाणाऱ्या एका १२ वर्षीय मुलीला तिच्या घरच्यांनी शाळेत येण्यासाठी टॅक्सी दरमहा भाडेतत्त्वावर घेतली होती.

३५ वर्षीय हाजी मुहम्मद ही टॅक्सी चालवत असे. शाळेत जाताना मुलगी एकटीच असे, हे पाहून त्याची नियत बदलली. या दरम्यान तो तिला त्रास देऊ लागला. तिच्यासोबत अश्लील चाळे करू लागला. सातत्याने त्याने मुलीचे शोषण सुरू ठेवले. मुलीने घरच्यांना केलेल्या तक्रारीनुसार, हाजी मोहम्मद मुलीला गाडीत पुढे बसण्यास सांगत होता. तिला नकोसा स्पर्श करू लागला. याबद्दल मुलीने घरच्यांना सांगितल्यानंतर त्यांना धक्काच बसला.

तिला तोंड बंद ठेवण्यासाठी विविध ठिकाणी फिरवण्याचे प्रलोभनही देत असे. तसेच जर का ही गोष्ट घरच्यांना कळली तर तुझा जीवही घेईन, अशा प्रकारची धमकीही त्याने दिली होती. घडला प्रकार उघडकीस आल्यावर पोलीस प्रशासनाकडे घरच्यांनी धाव घेतली. याबद्दल हाजी मोहम्मदच्या विरोधात पोलीसांनी तक्रार दाखल केली आहे. त्याच्या विरुद्ध POCSOसह अन्य महत्त्वाच्या कलमांतर्गत कारवाई सुरू केली आहे. पोलीसांनी मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविले आहे. हाजी मोहम्मद सध्या फरार आहे. पोलीसांनी त्याच्या मागावर आहेत.