"घाबरू नका, माझ्यासारखं पळून जा"; राहुल गांधींनी अमेठीतून माघार घेताच नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

03 May 2024 11:48:18
Rahul Gandhi
नवी दिल्ली : काँग्रेसने शुक्रवार, दि. ३ मे २०२४ राहुल गांधी अमेठीतून नव्हे तर रायबरेलीमधून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. याचा अर्थ ते भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्याशी निवडणूक लढवणार नाहीत. आता सोशल मीडिया त्याच्या या निर्णयाची खिल्ली उडवली जात आहे. राहुल गांधींनी मैदान सोडल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. त्यांचे एक जुने विधान 'डरो मत' देखील पुन्हा शेअर केले जात आहे आणि 'फट्टूपप्पू' नावाने एक ट्रेंड चालविला जात आहे.
 
राहुल गांधी त्यांची आई सोनिया गांधी यांच्या जागी रायबरेलीतून निवडणूक लढवणार आहेत, तर काँग्रेसने अमेठीतून किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. राहुल गांधी २०१९ मध्ये अमेठी निवडणुकीत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडून पराभूत झाले होते आणि ते वायनाडमधून खासदार झाले होते. यावेळी त्यांनी आधी केवळ वायनाडमधून उमेदवारी दाखल केली होती आणि आता ते रायबरेलीमधून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
 
 
सोशल मीडियावर लोक काँग्रेसच्या या निर्णयाचा खिल्ली उडवत आहेत आणि 'फट्टूपप्पू' ट्रेंड करत आहेत. हा ट्रेंड चालवणाऱ्यांचे म्हणणे आहे की, राहुल गांधी स्मृती इराणींविरुद्ध लढायला आले नाहीत कारण त्यांना पराभवाची भीती होती. त्याच्यावरचे अनेक मीम्सही व्हायरल होत आहेत.
 
एका नेटकऱ्यांने राहुल गांधींच्या डरो मत या विधानससोबत त्यांचा पळण्याचा फोटो शेअर केला. सोबतचं या फोटोला नेटकऱ्याने कप्शन दिले आहे की, “घाबरू नका, पळून जा.” प्रियांका गांधी रायबरेलीमधून निवडणूक लढवू शकतात, अशी चर्चा याआधी सुरू होती. मात्र, आता या अटकळांना पूर्णविराम मिळाला आहे.
 
 
दुसरीकडे प्रियंका गांधी अमेठमधील फुरसातगंज विमानतळावर पोहोचल्या आहेत. येथे त्या काँग्रेसच्या निवडणूक प्रचारात सहभागी होणार आहेत. त्या अमेठीतही काँग्रेस उमेदवाराच्या नामांकनात भाग घेणार आहेत. अमेठी आणि रायबरेलीमध्ये नामांकनाची अंतिम तारीख शुक्रवार दि. ३ मे २०२४ आहे. येथे दि. २० मे रोजी मतदान होणार आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0