Q4 Results: सर्वात महागडा शेअर अशी ओळख असलेल्या एमआरएफ टायर्सचा तिमाही निकाल जाहीर कंपनींचा निव्वळ नफा घटत ३७९.६ कोटी ' इतका ' लाभांश जाहीर

कंपनीने प्रति समभाग १९४ रुपयांचा लाभांश जाहीर केला

    03-May-2024
Total Views |

MRF
 
 
मुंबई: भारतातील सर्वात महाग शेअर अशी ओळख असलेल्या एमआरएफ टायर्स (MRF Typres) ने आपला चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला आहे. कंपनीला चौथ्या तिमाहीत एकूण ३७९.६ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. मागील वर्षाच्या ४१०.७ कोटींच्या तुलनेत नफ्यात ७.६ टक्क्यांनी घट झाली आहे. कंपनींच्या कारभारातून महसूलात (Revenue From Operations) मध्ये ८.६ टक्क्यांनी वाढ झाली असून महसूल ६२१५.१ कोटीवर पोहोचले आहे याआधी महसूल ५७२५.४ कोटी होते.
 
कंपनींच्या कर व इतर खर्च पूर्व (EBITDA) मध्ये ५ टक्क्यांनी वाढ झाली असून नफा ८८५.७ कोटींवर पोहोचले आहे मागील वर्षी करपूर्व नफा ८४३.१ कोटींवर गेला होता. ईबीआयटीडीए मार्जिनमध्ये १४.७ टक्क्यांवरून १४.३ टक्क्यांवर घट झाली आहे.
 
कंपनींच्या खर्चात इयर ऑन इयर बेसिसवर ९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या ५४१० कोटींच्या तुलनेत यंदा ५९१६ कोटी खर्च झाला आहे. महसूलात वाढ झाली असली तरी नफ्याचे मार्जिन कमी होत ६.१५ टक्क्यांवर पोहोचले आहे मागील आर्थिक वर्षात हे मार्जिन ८.१७ टक्के होते.
 
संपूर्ण वर्षासाठी कंपनीचा निव्वळ नफा मागील वर्षाच्या ७६८.९४ कोटींच्या तुलनेत २०८१.२३ कोटींवर पोहोचला आहे. शेअर बाजार बंद होताना एम आर एफ चा शेअर ४.८ टक्क्यांनी घसरला आहे. एम आर एफ कंपनीने यावेळी प्रति समभाग १९४ रुपयांचा लाभांश (Dividend) जाहीर केला आहे