आता बनावट कंपन्या व जीएसटी व्यवहार करणाऱ्या कंपन्यांना आळा बसणार

जीएसटी अधिकारी यांची समन्वय बैठक होणार

    03-May-2024
Total Views |

gst collection
 
 
मुंबई: आता कर चुकव्यांचे वाईट दिवस सुरू होणार आहेत का असे विचारण्यास हरकत नाही कारणही तसेच आहे जीएसटी केंद्रीय व राज्याच्या अधिकारी वर्गाने एकत्र येत नवीन बैठक बोलावली आहे. या नवीन बैठकीत कर चुकवण्यासाठी हातखंडे वापरणाऱ्या कंपन्यांना तसेच बनावट कंपनीच्या नोंदणी करणाऱ्या कंपन्यांना आळा घालण्यासाठी उपाय आणण्यासाठी चर्चा होण्याची शक्यता आहे.
 
काही दिवसांपूर्वी जीएसटी कर संकलनात रेकॉर्ड ब्रेक वाढ झाली होती. पहिल्यांदाच २.१० लाख कोटींचे संकलन करण्यात केंद्र सरकार यशस्वी झाले होते. याच धर्तीवर ही बैठक ठेवल्याचे समजत आहे. कर विभागाच्या अधिकाऱ्यांची ही संयुक्तिक बैठक होणार असून जीएसटीत गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी उपाययोजना केली जाणार आहे.
 
केंद्रीय आणि राज्य कर प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तिसरी राष्ट्रीय समन्वय बैठक, इतर गोष्टींबरोबरच, फक्त इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करण्यासाठी स्थापन केलेल्या बनावट कंपन्यांना आळा घालण्यासाठी वस्तू आणि सेवा कर (GST) अंतर्गत नोंदणी अधिक कडक करण्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.