महाराष्ट्र भाजप बूथस्तरीय कार्य समितीची घोषणा; भागवत कराड संयोजकपदी

    29-May-2024
Total Views |
maharashtra bjp bhagwat karad
 
 
 
मुंबई :     आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पूर्वतयारी सुरू केली असून, महाराष्ट्र प्रदेश बूथस्तरीय कार्य ( योजना ) समितीची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांच्यावर या समितीच्या संयोजक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दि. २९ मे रोजी यासंदर्भात घोषणा केली.


हे वाचलंत का? - वाराणसीचा आशीर्वाद पंतप्रधानांसोबत – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


खासदार अनिल बोंडे, धनंजय महाडिक, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे यांच्यासह आमदार योगेश सागर यांच्यावर सहसंयोजक पदाची पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रदेश भाजपच्या सरचिटणीस अॅड. माधवी नाईक, विक्रांत पाटील, विजय चौधरी, प्रदेश प्रभारी रवींद्र अनासपूरे, मुंबईचे सरचिटणीस संजय उपाध्याय, प्रदेश सचिव राणी द्विवेदी, कार्यकारिणी सदस्य दिनेश सूर्यवंशी, सोशल मीडिया प्रभारी श्वेता शालिनी, प्रवीण साले, सुधीर देऊळगावकर यांना सहसंयोजक पदावर नेमण्यात आले आहे. तर, विदर्भचे संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर यांच्यावर समन्वयक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.