'एयुएम'मध्ये इतकी वाढ, विरोधकांनी टीका केलेल्या 'या' सरकारी कंपनीची विक्रमी घोडदौड!

29 May 2024 15:28:04
lic asset under mangement value


नवी दिल्ली : 
  देशातील सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनी (एलआयसी) च्या एकूण मालमत्तेत गेल्या वर्षीच्या तुलनेत १६.४८ टक्के वाढ झाली आहे. दरम्यान, भारतीय शेअर बाजारात सातत्याने वाढ होत असून एलआयसीची मालमत्ता ५० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी व तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी या सरकारी कंपनीला टीकेचे लक्ष्य केल्याचे पाहायला मिळाले होते. त्यांनंतर आता कंपनीने आर्थिक झेप घेतली आहे. 


हे वाचलंत का? -   पाकिस्तानचा आदर करा सांगणाऱ्या मणिशंकर यांचे चीन प्रेम उफाळले; १९६२ च्या हल्लाचे 'कथित' असे वर्णन


दरम्यान, एलआयसीच्या व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्तेत गेल्या वर्षीच्या तुलनेत १६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एलआयसीची एकूण व्यवस्थापनाखालील भांडवल(AUM) ५१ लाख २१ हजार ८८७ कोटी रुपये इतके झाले आहे. विशेष म्हणजे गेल्या मार्च २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत ही वाढ नोंदविण्यात आली आहे.

मार्च २०२३ मध्ये एलआयसी अंतर्गत एकूण मालमत्ता ४३,९७,२०५ कोटी रुपये होती. एलआयसीची एकूण बाजार भांडवल पाकिस्तानच्या जीडीपीपेक्षा अधिक आहे. सध्या पाकिस्तानचा जीडीपी ३७४.६९ अब्ज डॉलर आहे. म्हणजेच एलआयसी आता मालमत्तेच्या बाबतीत पाकिस्तानपेक्षा दीडपट अधिक मौल्यवान बनली आहे.



Powered By Sangraha 9.0