ब्लड सँपल बदलण्यासाठी विशाल अग्रवालची धडपड! डॉ. तावरेंना २ तासांत १४ कॉल्स

29 May 2024 12:57:57
 
Agrawal & Tavare
 
पुणे : पुणे पोर्शे कार अपघातातील आरोपीचे वडील विशाल अग्रवालने आपल्या लेकाला वाचवण्यासाठी डॉ. अजय तावरेंना २ तासांत तब्बल १४ कॉल्स केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवालचे रक्ताचे नमुने घेण्याच्या आधी दोघांमध्ये कॉलवर बोलणं झाल्याचं सांगण्यात येत आहे.
 
आरोपी वेदांत अग्रवालचे ब्लड सँपल बदलल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टर आणि एका शिपायाला अटक करण्यात आली आहे. डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हळनोर आणि अतुल घटकांबळे अशी त्यांची नावं आहेत. या तिघांनी मिळून आरोपी वेदांतच्या ब्लड सँपलमध्ये फेरफार करून त्याऐवजी दुसऱ्याच व्यक्तीचे ब्लड सँपल घेतले होते.
 
हे वाचलंत का? -  मुंबई शिक्षक मतदारसंघातून शिवाजीराव नलावडेंना उमेदवारी जाहीर!
 
मात्र, ब्लड सँपल घेण्याच्या आधी विशाल अग्रवाल आणि डॉ. अजय तावरे हे २ तासांत तब्बल १४ वेळा फोनवर बोलल्याची माहिती पुढे आली आहे. या कामासाठी त्यांना तीन लाख रुपये मिळाले होते. पोलिसांनी डॉ. श्रीकांत हळनोर आणि अतुल घटकांबळे यांच्याकडून काही पैसे जप्त केले आहेत.
 
याप्रकरणाच्या तपासासाठी एक चौकशी समिती गठित करण्यात आली असून या समितीने मंगळवारी ससून रुग्णालयात भेट दिली. तसेच अपघातावेळी आरोपीसोबत असलेल्या मित्रांचीही चौकशी करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी नवनवीन खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0