मुंबई : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी येत्या २६ जूनला मतदान होणार असून राष्ट्रवादी काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला आहे. अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने शिवाजीराव नलावडे यांना मुंबई शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंगळवार, दि. २८ मे रोजी यासंदर्भात घोषणा केली.
हे वाचलंत का? - सावरकरांचे हिंदूत्व हेच राष्ट्रीयत्व!
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ यांच्या उपस्थितीत झालेल्या संसदीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शिवाजीराव नलावडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य आहेत. राज्यातील सहकार चळवळीमध्ये त्यांचे योगदान आहे. मुंबई बँकेचे माजी अध्यक्ष राहिलेले नलावडे गेल्या ३० वर्षांपासून या संस्थेत कार्यरत आहेत.