मुंबई: एलआयसी (LIC) या देशातील सर्वाधिक मोठ्या विमा कंपनीने काल आपला चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला होता. त्यानंतर कंपनीच्या व्यवस्थापना अंतर्गत (Asset Under Management) मध्ये मोठी वाढ झाली आहे. कंपनीचे बाजार भांडवल (Market Capitalisation) ५१२१८८७ कोटींवर पोहोचला आहे हे बाजार भांडवल एकत्रितपणे पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका यांच्या एकत्रित जीडीपीहून अधिक वाढले आहे. बाजार भांडवलानुसार एलआयसीने मोठी झेप गाठली आहे. आयएमएफच्या ( IMF) आकडेवारीनुसार हे स्पष्ट झाले आहे.
एलआयसीने या वर्षाच्या तिमाहीत १६.४८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीने आपली मालमत्ता ५० लाख कोटीहून अधिक मिळवले आहे. मार्च अखेरपर्यंत एलआयसीची मालमत्ता ५१२१८८७ कोटींवर पोहोचली आहे. पाकिस्तान (३३८ अब्ज डॉलर) नेपाळ (४४.१८ अब्ज डॉलर) श्रीलंका (७४.८५ अब्ज डॉलर) याहून अधिक वाढवले आहे.
आर्थिक वर्ष २०२४ मध्ये एलआयसीला ४०६७६ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे तर प्रिमियम उत्पन्न ४७५०७० कोटींवर पोहोचले आहे. याशिवाय विमाधारकांना ५२९५५.८७ कोटींचा बोनस एलआयसीने दिला होता. देशातील एकूण विमा क्षेत्रातील ५९ टक्के वाटा केवळ एलआयसीचाच आहे.कंपनी आता आरोग्य क्षेत्रात आपले लक्ष केंद्रित करत आहे.
शेअर बाजारात एलआयसी सातव्या नंबरची सर्वाधिक बाजार भांडवल असणारी कंपनी ठरली आहे. कंपनीचे एकूण बाजार भांडवल ६.४६ लाख कोटींवर पोहोचले आहे. गेल्या सहा महिन्यांत कंपनीच्या शेअर्समध्ये ५२ टक्क्यांनी वाढ झाल्याचे पहावयास मिळाले. आजच्या घडीला एलआयसीमध्ये सरकारचे ९६.५ भागभांडवल सरकारचे आहे. नुकतीच सेबीने एलआयसीला पब्लिक शेअर होल्डिंग्स १० टक्के पर्यंत नेण्याची मुभा २०२७ पर्यंत दिलेली होती. या करीता एलआयसीकडून आगामी काळात १० टक्के भागभांडवल ऑफर फॉर सेल (Offer for sale) मधील माध्यमातून विकण्याची शक्यता आहे.