पेटीएमचा हिस्सा गौतम अदानी घेणार ही केवळ अफवा?

29 May 2024 11:36:40

Paytm
 
मुंबई: पेटीएम आपल्यातील काही हिस्सा अदानी समुहाला विकू शकतो असे प्रसारमाध्यमांनी म्हटले होते ते खरे नसल्याचे कंपनीने सांगितले आहे.'अशी कुठलीही चर्चा सुरु नाही तरी आलेले वृत्त हे केवळ अनुमान असल्याचे ' कंपनीकडून सांगण्यात आलेले आहे. तसेच आम्ही कायम सेबी नियमांचे पालन करत असतो असेदेखील कंपनीने म्हटले होते.
 
यापूर्वी पेटीएम कंपनीचे विजय शेखर शर्मा हे अहमदाबाद येथे अदानी यांच्या कार्यालयात त्यांना भेटले असल्याचे एका वृत्तपत्राने म्हटले होते ज्यात कुठलेही तथ्य नसल्याचे सांगितले गेले आहे. विजय शेखर शर्मा यांचा पेटीएम कंपनीत १९ टक्के भागभांडवल आहे ज्याचे बाजारातील मूल्यांकन ४२१८ कोटी रुपये आहे.
 
पेटीएमला झालेल्या नुकसानीमुळे आर्थिक घडी पुन्हा बसवण्यासाठी कंपनी आपला १५ ते २० टक्के कर्मचारी वर्गात कपात करू शकते. कंपनीचे एकूण ३२९७९८ कर्मचारी काम करतात. आर्थिक वर्ष २०२४ कंपनीच्या खर्चात ३४ टक्क्यांनी वाढ होऊन ३१२४ कोटी खर्च झाला होता. आता पेटीएमने युपीआय लाईटवर आपले आर्थिक लक्ष केंद्रित केलेले आहे.
 
सध्या, ज्या ग्राहकांच्या पेटीएम वॉलेटमध्ये पैसे आहेत ते उपलब्ध शिल्लक रकमेपर्यंत पैसे काढू किंवा दुसऱ्या वॉलेट किंवा बँक खात्यात हस्तांतरित करू शकतात. एकदा शिल्लक संपल्यानंतर, ते यापुढे आरबीआयच्या निर्देशांनुसार पेटीएम वॉलेटमध्ये पैसे जोडू शकणार नाहीत.
 
Powered By Sangraha 9.0