तीन दिवसांत बिनशर्त माफी मागा अन्यथा...; मुख्यमंत्री शिंदेंची राऊतांना कायदेशीर नोटीस

29 May 2024 15:29:11
 
Shinde & Raut
 
मुंबई : तीन दिवसांत माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाई करणार, अशी नोटीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांना बजावली आहे. लोकसभा निवडणूकीत शिंदेंनी अफाट पैशांचा वापर केल्याचा दावा राऊतांनी केला होता. यावरून आता शिंदेंनी त्यांना थेट कायदेशीर नोटीस बजावली आहे.
 
काही दिवसांपूर्वी संजय राऊतांनी सामना वृत्तपत्रातील रोखठोक या सदरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत एक दावा केला होता. मुख्यमंत्री शिंदेंनी लोकसभा निवडणूकीत प्रत्येक मतदारसंघात २५ ते ३० कोटी रुपये वाटल्याचे त्यांनी म्हटले होते. याबाबत आता शिंदेंनी त्यांच्या वकीलामार्फत राऊतांना कायदेशीर नोटीस बजावली आहे.
 
हे वाचलंत का? - 'एआय'द्वारे जिवंत करणार पुणे अपघाताची घटना!
 
तीन दिवसांत बिनशर्त माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाई करणार, अशा थेट इशारा या नोटीशीतून देण्यात आला आहे. संजय राऊत हे सध्या परदेश दौऱ्यावर आहेत. अशातच त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे ते मुख्यमंत्री शिंदेंची माफी मागणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0