पुणे : अजित पवारांच्या कार्यालयाकडून जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चौकशीबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना प्रकरणी पुणे लाचलुचपत विभागाकडून करण्यात येत असलेली चौकशी जुनी असून त्यांच्याशी अजित पवारांचा काहीही संबध नाही, असे कार्यालयाने स्पष्टपणे सांगितले आहे.
हे ही वाचा : मोठी बातमी! एकनाथ शिंदे राऊतांना दणका देण्याच्या तयारीत! कारवाई निश्चित
यात अजित पवारांच्या कार्यालयाने सांगितले की, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात येत असलेली चौकशी ही १९९० ते २०१० या दरम्यान जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या व्यवहाराची आहे. या चौकशीचा उपमुख्यमंत्री अजित पवारांशी काहीही संबध नाही. कोरेगाव तालुक्यातील कारखान्याच्या सभासदांकडून डिसेंबर २०२१ साली ही तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर फेब्रुवारी २०२२ मध्ये लाचलुचपत विभागाने १९९० ते २०१० पर्यंत असलेल्या कारखान्यांचे संचालक मंडळ , त्यांचे नातेवाईक आणि प्रशासक यांनी घेतलेल्या निर्णयांची चौकशी सुरु करण्यात आली आहे, असे ही कार्यालयाने स्पष्टीकरण दिले आहे.