TDRF च्या धर्तीवर पालिकांनी पथकं सुरु करावेत : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

28 May 2024 16:08:47
Eknath Shinde On TDRF

मुंबई :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत मान्सूनपूर्व आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी SDRF पथकांची संख्या वाढवण्याच्या सूचना दिल्या. तसेच TDRF च्या धर्तीवर पालिकांनी पथकं सुरु करावेत. ज्यामुळे लोकांची तात्काळ मदत करता येईल.त्यादृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. त्याचबरोबर धोक्याची सूचना देणारी यंत्रणा अलर्ट ठेवावी.स्थानिक तरुणांना बचावकार्यासंदर्भात प्रशिक्षण द्यावे,असे ही शिंदे म्हणाले.

होर्डिंग अपघात, दरडग्रस्त विभाग आपत्ती घडू नयेत यासाठी पर्यायी व्यस्था करण्याच्या आणि आपत्तीकाळात जिवितहानी, मालमत्तेचे नुकसान होऊ नये यासाठी आपत्ती व्यवस्थापन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. तसेच कर्नाटक,तेलंगाणा, मध्यप्रदेश इथून येणाऱ्या पाण्याच्या नियोजनासाठी आणि समनव्य ठेवण्यासाठी चर्चा झाली. त्याचबरोबर नद्यांवरील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे. मुंबईतल्या रस्त्यावरील मॅनहोलला झाकणं आणि गर्डर बसवावं, अशा सूचना ही शिंदे यांनी दिल्या. तसेच सर्व यंत्रणांनी समन्वय साधून एकत्र काम करावे, असे ही शिंदे म्हणाले. तसेच मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी,गारपीट यासंदर्भात मदतकार्याबद्दल बैठकीत चर्चा झाल्याचे ही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
 

 
Powered By Sangraha 9.0