मुंबई : मोदीजींवर टीका करण्याआधी मल्लिकार्जून खर्गेंचा व्हिडीओ बघा, असा खोचक टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी संजय राऊतांना लगावला आहे. त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
मागील काही दिवसांपासून संजय राऊत सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका करीत असून तथ्यहीन गोष्टी पसरवित आहेत. यावर आता बावनकुळेंनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात "मेरा नाम है मल्लिकार्जुन खर्गे.. मैं ईश्वर का अवतार हूं..." असे खर्गे म्हणत आहेत.
हे वाचलंत का? - लोकसभेत काय होईल हे ब्रम्हदेवही सांगू शकत नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार
याबाबत बावनकुळे म्हणाले की, "संजय राऊत, तुमचे नेते मल्लिकार्जुन खर्गे बघा काय म्हणतात? आदरणीय मोदीजींवर टीका करण्याआधी मल्लिकार्जुनबुवांचा हा व्हिडीओ बघा! आणि ठरवा. मल्लिकार्जुनबुवा खरगे स्वतःला देवाचे अवतार म्हणू लागले. ‘मेरा नाम है मल्लिकार्जुन खरगे.. मैं ईश्वर का अवतार हूं…’ यांच्यावरही भ्रष्टलेख लिहा,” असा टोला त्यांनी राऊतांना लगावला आहे.