'पंचायत ३' वेब सीरीज प्रदर्शित होताच Leaked; मेकर्सला बसला मोठा झटका!

28 May 2024 14:30:08

panchayat  
 
 
मुंबई : लोकप्रिय वेब सीरीज पंचायत या सीरीजचे दोन्ही भाग प्रेक्षकांचा फार आवडले. यानंतर तिसरा भाग कधी येणार याची वाट पाहात असताना आज (२८ मे २०२४) पासून Amazon Prime Video वर पंचायत सीझन ३ प्रदर्शित झाला आहे. परंतु, प्रदर्शित होताच संपुर्ण सीझन Leaked झाल्याची घटना समोर आली असून मेकर्सना मोठा धक्का बसला आहे.
 
ओटीटीवरील 'पंचायत' ही सर्वाधिक लोकप्रियता मिळालेल्या सीरिजपैकी एक आहे. ३ एप्रिल २०२० ला 'पंचायत'चा पहिला सीझन प्रदर्शित झाला होता. त्यानंतर प्रेक्षकांकडून मिळालेला तुफान प्रतिसाद पाहून २० मे २०२२ रोजी 'पंचायत २' प्रेक्षकांच्या भेटीला आला. आणि अॅमेझॉन प्राइमवर पंचायतचा आता तिसरा सीझन प्रदर्शित करण्यात आला. पण, प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच 'पंचायत ३' वेब सीरिज ऑनलाईन लीक झाली आहे. त्यामुळे मेकर्सची चिंता प्रचंड वाढली आहे. तमिळरॉकर्स, टेलिग्राम, MovieRulz यांसारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर 'पंचायत ३' वेब सीरिज लीक झाली आहे.
 
दरम्यान, 'पंचायत' वेब सीरिजच्या कथानकामधून गावातील राजकारणाची हलकीफुलकी कथा मांडण्यात आली होती. फुलेरा गावात सचिव म्हणून आलेला अभिषेक त्रिपाठी अर्थात अभिनेता जितेंद्र कुमार प्रेक्षकांचा लाडका झाला. याशिवाय तर रघूवीर यादव, नीना गुप्ता यांच्या प्रमुख भूमिका होत्या. दुसऱ्या सीझनमध्ये शेवटचा भाग प्रेक्षकांना रडवून गेला.
Powered By Sangraha 9.0