भारतीय विचार साधना आयोजित पुण्यात राष्ट्रीय पुस्तक मेळा

    27-May-2024
Total Views |

pustak mela 
 
मुंबई : विद्येचे माहेरघर असलेली पुण्यनगरी नेहमीच साहित्य आणि वाङ्मयाची चाहती राहिली आहे. येत्या दि. ७,८ व ९ जून रोजी पुण्यात कोथरूड येथे राष्ट्रीय पुस्तक मेळ्यात भारतीय विचार साधना आयोजित राष्ट्रीय विचारांच्या पुस्तकांचे भव्य प्रदर्शन भरवण्यात येत आहे. हा पुस्तक मेळा IMCC इमारतीत हा संपन्न होणार आहे. या मेळ्यात ५२ प्रकाशनांची १२०० हून अधिक पुस्तके किमान १०% ते ५०% सवलतीत उपलब्ध होणार आहेत तसेच तीनही दिवस भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत.
 
यानिमित्ताने तीन नव्या पुस्तकांचे प्रकाशन भारतीय विचार साधना फाऊंडेशन आणि राष्ट्रीय पुस्तक न्यास यांनी आयोजित केले आहेत. या कार्यक्रमात साहित्य रसिकांना प्रसिद्ध लेखकांची थेट भेट घेता येणार आहे. अभ्यासक अक्ष जोग यांच्या 'दुर्लक्षित हिंदुत्ववादी' या पुस्तकाचे प्रकाशन दि. ७ जून रोजी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व स्तंभलेखक विनय सहस्त्रबुद्धे तसेच भांडारकर इन्स्टित्यूचे प्रदीप रावत यांच्या हस्ते होणार आहे. दि. ८ जून रोजी 'मुद्द्याची गोष्ट' याचे प्रकाशन प्रसिद्ध लेखक राजीव तांबे यांच्या हस्ते आणि प्रा. अनिरुद्ध देशपांडे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. तर तिसऱ्या दिवशी दि. ९ जूनला 'फाळणीच्या वेदना' या सांस्कृतिक वार्तापत्राच्या पुस्तकाचे प्रकाशन चंद्रकांत (दादा) पाटील व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डाॅक्टर सुरेश गोसावी यांच्या हस्ते होणार आहे.
 
साहित्य रसिकांनी या मेल्यास आवर्जून उपस्थित राहून मोठ्या प्रमाणावर पुस्तके खरेदी करावीत असे आवाहन आयोजकांनी केले आहे.