मुलावर लैंगिक अत्याचार करायचा नजाकत हकीम; त्रासाला कंटाळून पीडित मुलाने केली धारदार चाकूने हत्या

27 May 2024 13:07:48
 murder
 
लखनौ : उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये हकीम नजाकत नावाच्या ५० वर्षीय व्यक्तीची एका १५ वर्षीय मुलाने हत्या केली होती. ही घटना दि. १९ मे रोजी घडली. अल्पवयीन मुलाच्या म्हणण्यानुसार, मृताने त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि हे भयानक कृत्य कॅमेऱ्यात रेकॉर्ड केले. त्यानंतर नजाकतने व्हिडिओचा वापर करून मुलाला ब्लॅकमेल केले आणि त्यानंतर त्याच्यावर सतत लैंगिक अत्याचार केले, ज्यामुळे तो अल्पवयीन चिडला आणि त्याने नजाकतची हत्या करण्याचा निर्णय घेतला.
 
नजाकतचा खराब झालेला मोबाईलही पोलिसांना सापडला आहे. शाहपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पालडी येथील त्याच्या गावातील एका खोलीत त्याचा मृतदेह आढळून आला. पोलीस अधीक्षक (ग्रामीण) आदित्य बन्सल म्हणाले, “खोलीला बाहेरून कुलूप लावले होते. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात आली आहे. आरोपीने सांगितलेल्या ठिकाणाहून खुनाचे हत्यार आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे.” पोलिसांनी सर्व तांत्रिक आणि फॉरेन्सिक पुरावेही तपासले. भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 हे वाचलंत का? - प्राचीन मंदिराच्या जमिनीवर रोहिंग्या, बांगलादेशींचा कब्जा; घुसखोरांना घर बांधण्यासाठी परदेशातून मदत
 
अधिकाऱ्यांना दि. २० मे रोजी या घटनेची माहिती मिळाली त्यानंतर त्यांना हकीमचा अर्धवट नग्न आणि रक्ताने माखलेला मृतदेह त्याच्या निवासस्थानी आढळला. हकीमची पार्श्वभूमीही गुन्हेगारी स्वरुपाची होती आणि त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न आणि गोहत्येसह अर्धा डझन गुन्हे दाखल आहेत. चार महिन्यांपूर्वी हकीम नजाकत याने आपल्याला आमिष दाखवून पळवून नेल्याचे आरोपीने सांगितले. त्यानंतर त्याने अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केले.
 
नजाकतने ही घटना कॅमेऱ्यात कैद केली आणि त्याचा फायदा त्याला धमकावण्यासाठी आणि अल्पयीन मुलावर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यासाठी केला. नजाकतने त्याला धमकावण्यासाठी चाकू आणि देशी बनावटीच्या बंदुकांचाही वापर केला. पत्नी व मुले घरी नसताना नजाकतने मुलाला तेथे बोलावून पुन्हा बलात्काराचा प्रयत्न केला.
 
हे वाचलंत का? -  मथुरेच्या प्रसिद्ध पंजाबी बाजाराचे इस्लामिक बाजार असे नामकरण; नाव बदलणाऱ्या 'वाहिद कुरेशी'ला अटक
  
अल्पवयीन मुलाने प्रतिकार केल्यावर नजाकतने मुलावर शारीरिक अत्याचारही केले. त्यानंतर अल्पवयीन मुलाने स्वसंरक्षणार्थ नजाकतवर हल्ला केला. त्याने दाओ (तलवारीसारखे शस्त्र) वापरले, जे जवळच ठेवलेले होते आणि त्याच्या डोक्यावर अनेक वेळा मारले. त्यानंतर अल्पवयीन मुलाने शस्त्र, हात पाय धुतले. त्याने आपले फोटो असलेला फोनही तोडला आणि तो शांतपणे छतावरून घराबाहेर पडला. त्यानंतर मुलाने खुनाचे हत्यार मशिदीसमोरील अवशेषांमध्ये लपवून ठेवले. पोलिसांनी तपास केल्यानंतर आरोपीचा शोध लागला. आरोपीला अटक करून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0