दिल्ली खासगी रुग्णालयातील आग प्रकरणी दोघांना अटक

27 May 2024 18:41:34
delhi-vivek-vihar-child-care-oxigen-cylinder-blast


 
नवी दिल्ली :      दिल्लीतील विवेक विहार भागातील बाल संगोपन केंद्रात लागलेल्या आगीमुळे नवजात बालकांचा मृत्यू झाला. या प्रकरणात न्यू बॉर्न बेबी केअर हॉस्पिटल मालक व डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. मालक डॉ. नवीन खिंची यांना दिल्ली पोलिसांनी राष्ट्रीय राजधानी परिसरातून अटक केली आहे. तसेच, २५ वर्षीय डॉ. आकाश यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान, पूर्व दिल्लीतील विवेक विहार येथे असलेल्या बाल संगोपन केंद्राला लागलेल्या भीषण आगीत ७ मुलांचा मृत्यू झाला आहे. याठिकाणी अनेक मुलांची सुटकाही करण्यात आली परंतु, १२ जण जखमी झाले. त्यापैकी ६ मुलांचा मृत्यू झाला, असून ५ जखमी मुलांपैकी एका मुलाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.


हे वाचलंत का? -   'गोऱ्या लोकांना....', पंतप्रधान शेख हसीना यांचे धक्कादायक वक्तव्य!


प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असून चाईल्ड केअर सेंटरमध्ये ठेवलेल्या डझनभर ऑक्सिजन सिलिंडरपर्यंत पसरल्याने स्फोट होऊ लागले. या स्फोटांमुळे आग वेगाने पसरत जवळच्या इमारतीपर्यंत पोहोचली. सिलिंडर सतत फुटत राहिल्याने रॉकेटसारखे आकाशात उडत होते, असे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बाल संगोपन केंद्रात आवश्यकतेपेक्षा जास्त ऑक्सिजन सिलेंडर ठेवण्यात आले होते असा आरोप स्थानिक लोकांनी केला आहे. याबाबत नागरिकांनी तक्रारीही केल्या होत्या, मात्र कारवाई झाली नाही. दरम्यान, आता आगीमुळे स्फोट होऊ लागल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचे दिसून आले.



Powered By Sangraha 9.0