भारताला मजबूत करण्यासाठी 'मजबूत सरकार' आवश्यक : स्वामी जितेंद्रानंद सरस्वतीजी महाराज

27 May 2024 17:20:13

Swami Jitendranand

मुंबई (प्रतिनिधी) :
(Swami Jitendranand) "जगाचे पोट भरणारा देश म्हणून आज भारताची ओळख झाली आहे. कोरोनाच्या काळात डझनभर देशांना लसीची मदत देण्याचे कार्य भारताने केले आहे. आज आपल्या क्षमतेच्या बळावर भारताची जगात एक वेगळी ओळख आहे. त्याचप्रमाणे भारताला पुढे नेण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी एक मजबूत सरकार आवश्यक आहे. म्हणून आपल्याला शक्य तितके मतदान करावे लागेल. त्यासाठी जनमत सुधारणे आवश्यक आहे.", असे प्रतिपादन स्वामी जितेंद्रानंद सरस्वती महाराज यांनी केले.

हे वाचलंत का? : राष्ट्र उभारणीत महिलांची भूमिका महत्त्वाची!

देवर्षी नारद जयंतीनिमित्त विश्व संवाद केंद्र गोरखपूरच्या वतीने सरस्वती विद्या मंदिर सभागृहात चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून स्वामी जितेंद्रानंद सरस्वतीजी महाराज यांनी उपस्थितांना संबोधित केले.
ते म्हणाले, "आज काही लोक भारताला राज्यांचा समूह म्हणतात. पण आपला भारत एक राष्ट्र आहे. ज्याप्रमाणे देवर्षी नारद तिन्ही जगात पोहोचून लोकांचा दृष्टिकोन आणि माहिती गोळा करत असत, त्याचप्रमाणे आजच्या माध्यमांनीही याकडे लक्ष देऊन समाजाचा दृष्टिकोन बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे."


Swami Jitendranand

कार्यक्रमाच्या विशेष अतिथी म्हणून आयएमएच्या अध्यक्षा डॉ.स्मिता जयस्वाल उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या. "राष्ट्रीय भावनेने लोकशाही मजबूत करण्याकरीता १०० टक्के मतदानासाठी प्रयत्न करावे लागतील. सुदृढ लोकशाहीत पत्रकारितेला खूप महत्त्व आहे, त्यामुळे जास्तीत जास्त मतदान सुनिश्चित करण्याची जबाबदारीही माध्यमांची आहे."

Powered By Sangraha 9.0