भारताचा जीडीपी १० बीपीएसने वाढून ६.७ टक्के राहणार !

27 May 2024 14:27:20

Goldman Sachs
 
 
मुंबई: प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार,गोल्डमन सचस या संस्थेने नवे जीडीपीची अनुमान घोषित केले आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) १० बेसिस पूर्णांकाने वाढून ६.७ टक्क्यांवर जाईल असे म्हटले आहे. चौथ्या तिमाहीत आरबीआय व्याजदरात कपात देखील करेल असे गोल्डमन सचस (Goldman Sachs) कंपनीने म्हटले आहे. जानेवारी ते एप्रिल ते मार्च महिन्यात महागाई दर ३.४ टक्क्यांवर राहू शकतो असे आरबीआयने म्हटले आहे.
 
तसेच महागाई दरात उष्ण हवामानामुळे वाढ होऊ शकते मुख्यतः हवामानात होणारे बदल पाहता पुरवठ्यात घट झाल्याने मागणीत वाढ होऊ शकते परिणामी महागाई दरात घट वाढ होईल असा अंदाज यात वर्तवला गेला आहे.'पुढे जाऊन आरबीआयने अपेक्षेपेक्षा जास्त लाभांश सरकारला दिल्याने पायाभूत सुविधांच्या खर्चासाठी अतिरिक्त वित्तीय जागेसह गुंतवणूक वाढीची गती कायम राहिल अशी आम्हाला अपेक्षा आहे. परिणामी आम्हीच अलीकडे २०२४ मध्ये आमचे वाढीव अंदाज १० बीपीएसने वाढवले आहेत असे गोल्डमन सचसचे आशिया पॅसिफिकचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ अँड्र्यू टिल्टन, व आर्थिक संशोधन प्रमुख संतनु सेनगुप्ता ' यांनी एकत्रित पणे म्हटले आहे.
 
याशिवाय आर्थिक वर्ष २०२४ मधील चौथ्या तिमाहीत आरबीआय व्याजदरात कपात होऊ शकते असे अनुमान नोंदवले होते त्यामुळे डिसेंबर २०२४ मधील पहिल्या तिमाहीत व्याजदरात कपात होऊ शकते. युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात करण्याबद्दल फेडरल जून ते सप्टेंबर महिन्यातील कालावधीत होऊ शकते व यावर्षी दोनदा व्याजदरात कपात होऊ शकेल ही शक्यता बोलून दाखवली गेली आहे.
 
Powered By Sangraha 9.0