दहावीचा निकाल जाहीर! यंदाही मुलींची बाजी

27 May 2024 13:05:35

Students 
 
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीचा (10th result) निकाल जाहीर झाला असून यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. यावर्षी दहावीचा एकूण निकाल ९५.८१ टक्के इतका लागला आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजता आपला निकाल पाहता येणार आहे.
 
राज्यात यंदाही दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी तब्बल ९७.२१ टक्के मुली उत्तीर्ण झाला आहेत तर ९४.६५ टक्के मुलं दहावीत उत्तीर्ण झाले आहेत. बारावीप्रमाणेच दहावीतही कोकण विभागाने बाजी मारली असून याठिकाणी सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
 
राज्यातील ९ विभागातील निकालाची आकडेवारी पुढीलप्रमाणे :
 
पुणे - ९६.४४ टक्के
छत्रपती संभाजीनगर - ९५.१९ टक्के
मुंबई - ९५.८३ टक्के
कोल्हापूर - ९७.४५ टक्के
नागपूर - ९४.७३ टक्के
अमरावती - ९५.५८ टक्के
नाशिक - ९५.२८ टक्के
लातूर - ९५.२७ टक्के
कोकण - ९९.०१ टक्के
 
विद्यार्थ्यांना पुढील वेबसाईटवर निकाल पाहता येणार :
 
https://mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
https://results.digilocker.gov.in
https://results.targetpublications.org
 
 
 
Powered By Sangraha 9.0