आयपीएल 2024 फायनलसाठी गुगलकडून खास 'डूडल'!

26 May 2024 16:30:38
ipl final kkr vs srh doodle



मुंबई :      यंदा आयपीएलच्या १६व्या मोसमात कोलकाता नाईट रायडर्स विरुध्द सनरायझर्स हैदराबाद यांच्यात अंतिम सामना खेळविला जाणार आहे. अंतिम सामना एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे खेळविण्यात येणार असून फायनलसाठी गुगलकडून खास 'डूडल' बनविले आहे. या डूडलमध्ये खेळपट्टी, बॅट, बॉल व फायनलसंदर्भातील अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे. कोलकाता विरुध्द हैदराबाद यांच्यात चेन्नईमध्ये फायनल होणार आहे.

दरम्यान, संध्याकाळी ७:३० वाजता हे दोन्ही संघ एकमेकांविरोधात लढत होणार असून संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष फायनलकडे लागले आहे. अंतिम सामन्यात पाऊस पडण्याची शक्यता असून या मैदानावरील खेळपट्टीची चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. चेपॉकवरील फायनल सामन्यात धावांचा पाऊसदेखील पडू शकतो असा अंदाज ऑफिशियलकडून वर्तविला जात आहे.

विशेष अंतिम सामन्याकरिता खेळपट्टीची तयारी वानखेडे मैदानाप्रमाणे लाल मातीची असणार आहे असं पीच क्युरेटर सांगितल्याचे समोर आले आहे. कोलकाता नाईट रायडर्स की सनरायझर्स हैदराबाद यांच्यात जेतेपदासाठी लढत होणार आहे. आतापर्यंत हे दोन्ही संघ २७ वेळा आमनेसामने आले आहेत. यात कोलकात्याने १८, तर हैदराबादने ९ वेळा विजय मिळवला आहे.

पावसामुळे सामना रद्द झाल्यास काय होणार!

कोलकाता विरुध्द हैदराबाद यांच्यातील अंतिम सामन्यात पावसाचे व्यत्यय येण्याची शक्यता असून सामना पावसामुळे रद्द झाल्यास तो राखीव दिवशी खेळविला जाणार आहे. तसेच, राखीव दिवशी म्हणजेच सोमवारीदेखील पावसामुळे सामन्यात व्यत्यय आल्यास ५-५ षटकांचा सामना खेळवण्याचा प्रयत्न केला जाईल. तरीदेखील शक्य न झाल्यास सुपर ओव्हरमार्फत निकाल लावण्यात येईल. परिणामी, सामना झालाच नाही तर गुणतालिकेत अग्रस्थानी असलेल्या संघाला विजयी घोषित केले जाईल.





Powered By Sangraha 9.0