तृणमूलच्या दाव्याची निवडणूक आयोगाकडून पोलखोल!

25 May 2024 20:49:40
election commission of india  


नवी दिल्ली :     लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात विरोधक सतत खोटे आरोप करुन स्वतःचं हसं करून घेत आहेत, अशी टिप्पणी निवडणूक आयोगाने ईव्हीएमसंदर्भातील आरोपांवर बोलताना केली आहे. दरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या आरोपांचे खंडन करताना आयोगाने या प्रकरणात अपूर्ण माहितीसह खोटे कसे पसरवत आहे, तर वास्तविकता अशी आहे की त्या स्वाक्षऱ्या कमिशनिंग दरम्यान केल्या गेल्या होत्या, हेदेखील स्पष्ट केले आहे.

दरम्यान, ईव्हीएमच्या संदर्भात तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आलेल्या आरोपांवर निवडणूक आयोगाने प्रतिक्रिया दिली असून वास्तविकता अशी आहे की त्या स्वाक्षऱ्या कमिशनिंग दरम्यान केल्या गेल्या होत्या. त्या ठिकाणी अन्य उमेदवारांचे एजंट असते तर त्या पक्षाच्या सह्याही त्या ठिकाणी दिसल्या असत्या, असे स्पष्टीकरण आयोगाकडून देण्यात आले आहे.

लोकसभेच्या सहाव्या टप्प्यातील मतदानादरम्यान तृणमूल काँग्रेसने रघुनाथपूर, बांकुरा येथे भाजपचे टॅग असलेले ५ ईव्हीएम सापडल्याचा आरोप केला आहे. ट्विटमध्ये निवडणूक आयोगाला तातडीने कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे. यासोबतच फोटोमध्ये दिसणारा कागदही लाल रंगात असून जेणेकरून कोणत्या गोष्टीला भाजपचा टॅग म्हटले जात आहे हे कळू शकेल, असे सांगण्यात येत आहे.

आता निवडणूक आयोगाने या ट्विटला उत्तर देताना टीएमसीच्या दाव्याची पोलखोल केली असून कमिशनिंग दरम्यान, उमेदवार आणि त्यांच्या एजंट्सद्वारे उपस्थित असलेल्या कॉमन ॲड्रेस टॅगवर स्वाक्षरी करण्यात आली. तसेच, निवडणूक आयोगाने स्पष्ट केले की, त्यावेळी केवळ भाजप उमेदवाराचा प्रतिनिधी उपस्थित असल्याने ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी सक्रिय करण्यासाठी त्यांची स्वाक्षरी घेण्यात आली.



Powered By Sangraha 9.0