Q4 Results: सुझलॉन तिमाही निकाल जाहीर कंपनींच्या निव्वळ नफ्यात २१ टक्क्यांनी घट एकूण नफा २५४ कोटी

25 May 2024 12:53:35
 
Suzlon
 
 
मुंबई: सुझलॉन कंपनीने आपला चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला. नवऊर्जा निर्मिती कंपनी सुझलॉनने इयर ऑन इयर बेसिसवर ( YoY) कंपनीला २१ टक्क्यांनी निव्वळ नफ्यात घट झाली असून कंपनीला एकूण २५४ कोटींचा नफा मिळाला आहे. मागच्या वर्षीच्या तिमाहीत कंपनीला ३२० कोटींचा निव्वळ नफा झाला होता. संपूर्ण वर्षातील कंपनीच्या निव्वळ नफ्यात घट झाली असुन मागील वर्षाच्या २८८७ कोटीवरून ६६० कोटींवर नफा पोहोचला आहे.
 
कंपनीत उत्पन्नातदेखील वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या तिमाहीतील १६९९.९६ कोटींच्या तुलनेत कंपनीला २२०७.४३ कोटींचा नफा झालेला आहे. मार्च महिन्यातील तिमाहीत कंपनीच्या महसूलात ३० टक्के वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या तिमाहीत कंपनीला १६९४ कोटींचा महसूल मिळाला होता जो या वर्षाच्या तिमाहीत २१९६ कोटींचे महसूल मिळाले आहे.
 
कंपनीचा ईबीआयटीडीए (EBITDA) मार्च महिन्यातील तिमाहीत ५४ टक्क्यांनी वाढत ३५७.२ कोटींवर पोहोचला आहे तसेच ईबीआयटीडीए मार्जिनमध्ये २६० बेसिस पूर्णांकाने वाढ होत १३.७ टक्क्यांवरून १६.३ टक्क्यांवर वाढ झाली आहे.कंपनीच्या करोत्तर नफ्यात (Profit After Tax) ४११ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीच्या कामकाजातून मिळणाऱ्या महसूलात (Revenue from Operations) २९ टक्क्यांनी वाढत २१७९ कोटीवर पोहोचला आहे. मागील वर्षी हे महसूल १६८९ कोटी होते.
 
Powered By Sangraha 9.0