शेअर बाजार अपडेट : कालची वाढ सकाळी कायम, पहिल्यांदाच निफ्टी २३००० पार सेन्सेक्स २५.१८ व निफ्टी ५.८५ अंशाने वधारला ' हे ' शेअर वधारले

24 May 2024 11:36:24

Stock Market
 
मुंबई: आज सकाळी इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात कमाल झाली आहे. पहिल्यांदाच निफ्टीने २३००० ची पातळी पार केलेली आहे. सकाळच्या सत्रात ११ वाजेपर्यंत सेन्सेक्स निर्देशांक‌‌‌ २५.१८ अंशाने वाढत ७५४४३.२२ पातळीवर पोहोचला आहे. निफ्टी ५० निर्देशांक ५.८५ अंशाने वाढत २२९७३.५० पातळीवर पोहोचला सेन्सेक्स बँक निर्देशांकात ३२.२४ अंशाने वाढत ५५७७२.४८ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी बँक निर्देशांक ४४.२० अंशाने वाढत ४८८१२.८० पातळीवर पोहोचला आहे.
 
बीएसईत मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.२९ व ०.३८ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर एनएसईतील मिडकॅप व स्मॉल कॅपमध्ये अनुक्रमे ०.१७ व ०.३३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात (Sectoral Indices ) मध्ये सर्वाधिक वाढ निफ्टी मिडिया (१.१७%) समभागात झाली असून पीएसयु (०.६५%), मेटल (०.९०%) समभागात वाढ झाली आहे. सर्वाधिक घसरण हेल्थकेअर (०.४९%), मिडस्मॉल हेल्थकेअर (०.३४%), फार्मा (०.३१%) समभागात झाली आहे.
 
आज शेअर बाजारात कालच्या उसळीचे लोण आजही कायम दिसले आहेत. विशेषतः मिड कॅप व स्मॉलकॅपमध्ये वाढ झाल्याने लार्जकॅप वगळता इतर समभागात गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसत आहे. अमेरिकन बाजारातील फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होण्याची शक्यता दूर झाल्याने गुंतवणूकदारांनी भारतातील सकारात्मक परिस्थितीत लक्ष केंद्रित केल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण आहे.
 
कुठल्या समभागात (Shares) सर्वाधिक वाढ झाली आहे?
 
BSE - बिकाजी फूड (४.५१%), अदानी टोटल गॅस (४.५%), अदानी एनर्जी (२.१६%), टोरंट पॉवर (१.९१%), एनएमडीसी स्टील (१.०५%), अल्ट्राटेक सिमेंट (१.०३%), फिनोलेक्स केबल (१५.४८%), भारत डायनामिक (१२.५४%),
 
सर्वाधिक कुठले घसरले ?
 
BSE - बेयर (५.३५%), शिंडलर (५.०%), पेटीएम (४.६५%), ओरकीड फार्मा (८.४५%)
 
कुठल्या समभागात सर्वाधिक वाढ?
 
NSE - फिनोलेक्स केबल (१६.८७%), भारत डायनामिक (१३%), अदानी एंटरप्राईज (१.४७%), वीआय (९.६१%), हिंदुस्थान एरोनॉटिकस (४.५८%), आरसीएफ (६.९७%)
 
सर्वाधिक कुठले घसरले ?
 
NSE- बेयर (५.२३%), शिंडलर (५%), गोदरेज प्रोपर्टी (२.५५%), पेटीएम (४.६६%), अपोलो हॉस्पिटल (१.५१%), श्रीराम फायनान्स (१.२८%), अदानी पोर्टस (१.७%)
 
Powered By Sangraha 9.0