रजनीकांत यांना UAE सरकारची खास भेट; मिळाला गोल्डन Visa

24 May 2024 16:15:24

rajanikanth
 
 
मुंबई : सुपरस्टार रजनीकांत यांचे चाहते केवळ दक्षिण भारतातच नव्हे तर संपुर्ण जगभरात आहेत. रजनीकांत यांच्या स्टाईलमुळे लोकं त्यांच्यावर जीवापाड प्रेम करतात. इतके मोठं व्यक्तिमत्व असूनही साधी राहणी असणाऱ्या रजनीकांत यांना युएइ सरकारने विशेष भेट दिली आहे. रजनीकांत यांना UAEच्या संस्कृती आणि पर्यटन विभागाकडून गोल्डन व्हिजा मिळाला आहे. नुकतीच ते अबू धाबीला गेले होते, त्यावेळी त्यांना हा व्हिजा सन्मानपूर्वक देण्यात आला. याबद्दल रजनीकांत यांनी सरकारचे आणि लुलु समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एम ए युसूफ अली यांचेही आभार मानले आहेत.
 
रजनीकांत यांचा आभार मानताचा व्हिडिओ देखील असून त्यात ते म्हणतात की, “अबू धाबी सरकारकडून प्रतिष्ठित UAE गोल्डन व्हिजा मिळाल्यामुळे मला खूप सन्मानार्थक वाटतंय. या व्हिजासाठी आणि सर्व सहकार्यासाठी मी अबू धाबी सरकारचे आणि माझा चांगला मित्र युसूफ अली यांचे मनापासून आभार मानतो.'
 
 
 
दरम्यान, अबू धाबी कार्यकारी परिषदेचे सदस्य आणि अबू धाबी सरकारच्या संस्कृती आणि पर्यटन विभागाचे अध्यक्ष मोहम्मद खलिफा अल मुबारक यांच्या उपस्थितीत रजनीकांत यांना गोल्डन व्हिजा देण्यात आला.
Powered By Sangraha 9.0