मुलाने कार मागितली तर त्याला चालवायला दे; विशाल अग्रवालच्या ड्रायव्हरला सूचना

23 May 2024 15:57:33

Vishal Agrawal 
 
पुणे : मुलाने कार मागितली तर त्याला चालवायला दे, तू बाजूला बस अशा सूचना पुणे अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवाल यांनी आपल्या ड्रायव्हरला दिल्या होत्या. विशाल अग्रवालच्या ड्रायव्हरने चौकशीदरम्यान असा जबाब नोंदवला आहे. तसेच त्यामुळेच अपघात घडल्याचेही त्याने म्हटले आहे.  
 
मुलाने कार मागितली तर त्याला चालवायला दे, तू बाजूला बस, अशा सुचना विशाल अग्रवालने आपल्याला दिल्याचे त्याच्या ड्रायव्हरने जबाबात सांगितले आहे. तसेच गाडीमध्ये बिघाड होता, तरीसुद्धा विशाल अग्रवालच्या सुचनेनुसार आपण मुलाला गाडी चालवायला दिल्याचेही त्याने सांगितले आहे.
 
हे वाचलंत का? -  ब्रेकिंग! पुणे अपघात प्रकरणात बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय
 
पुणे पोर्शे कार अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने राज्यभरात सध्या संतापाचे वातावरण आहे. अपघातातील आरोपी वेदांत अग्रवाल याचा जामीन रद्द करुन १४ दिवसांसांठी त्याची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. तसेच त्याचे वडिल विशाल अग्रवाल यांच्यासह तिघांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
 
विशाल अग्रवालने मुलगा अल्पवयीन असतानाही त्याला महागड्या कारची चावी दिली होती. याशिवाय त्याला कार चालवायला देण्याच्या सुचनाही ड्रायव्हरला दिल्या होत्या. त्यामुळे त्याचे नियंत्रण सुटून मोठा अपघात घडला आणि यात दोन जणांचा बळी गेला.
 
 
 
Powered By Sangraha 9.0