शेअर बाजार अपडेट: अमेरिकेत दबाव भारतात सकाळच्या सत्रात मात्र उसळी सेन्सेक्स ३४७.३३ व निफ्टी १०१.४५ अंशाने वाढला

23 May 2024 11:17:27

Stock Market
 
 
मुंबई: आज सकाळी इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात मोठी वाढ झाली आहे. बाजारातील अस्थिरतेचा आधार तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील संमिश्र वातावरणात देखील भारतीय बाजारात सकाळी तेजी दाखवली आहे. सेन्सेक्स निर्देशांकात ३४७.३३ अंशाने वाढत ७४५७६.७० पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांकात १०१.४५ अंशाने वाढत २२६९९.२५ पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स व निफ्टी बँक निर्देशांकात अनुक्रमे ६२२.३७ अंशाने, व ५१८.८० अंशाने वाढला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांक ५५२८०.७५ पातळीवर व निफ्टी बँक निर्देशांक ४८३००.७५ पातळीवर पोहोचला आहे.
 
बीएसई मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.०९ व ०.११ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर एनएसईतील मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.०८ व ०.२५ अंशाने वाढ झाली आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात अधिकतम समभागात वाढ झाली आहे तर काही समभागात नुकसान झाले आहे. सर्वाधिक वाढ पीएसयु बँक (१.८९%), बँक (१.८%), आयटी (०.९८ %) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण मेटल (१.६१%), मिडिया (०.५८%), हेल्थकेअर (१.३१%) समभागात झाली आहे.
 
काल युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होण्याची चिन्हे जवळपास नष्ट झाली आहेत कारण युएस फेडरल रिझर्व्ह समितीची बैठक झाली ज्यामध्ये त्यांनी बैठकीतील मिनिट सार्वजनिक केली आहेत. बहुतांश सदस्यांनी लवकर व्याजदरात पात करणे शक्य नसल्याचे म्हटले आहे. मे महिन्यात महागाई दर कमी झाला असला तरी २ टक्के क्षमतेत नसल्याने बाजारातील महागाई कायम राहिल्यास दर कपात करणे शक्य नसल्याचे म्हटले आहे. युरोपातील बाजारात दबाव कायम आहे. भारतात मात्र निवडणूक निकाल काळात पुन्हा मोदी सत्तेवर परतत असल्याचा विश्वास वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे. परिणामी बाजारात कंपनीच्या धोरणात स्थिरता येण्याचे चित्र तयार झाल्याने आज बाजारात रॅली झाली आहे.
 
बीएसईत एक्सिस बँक, लार्सन, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, विप्रो, इन्फोसिस, टीसीएस, इंडसइंड बँक, टायटन कंपनी, टेक महिंद्रा, रिलायन्स, एचसीएलटेक, मारूती सुझुकी, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फायनान्स, कोटक महिंद्रा, एशियन पेंटस, एम अँड एम, एचयुएल, टाटा मोटर्स या समभागात वाढ झाली आहे तर सनफार्मा, पॉवर ग्रीड, टाटा स्टील, एनटीपीसी, आयटीसी, नेस्ले या समभागात घसरण झाली आहे.
 
एनएसईत एक्सिस बँक, लार्सन, आयशर मोटर्स, बीपीसीएल, आयसीआयसीआय बँक, अदानी एंटरप्राईज, श्रीराम फायनान्स, अपोलो हॉस्पिटल, इंडसइंड बँक, विप्रो, इन्फोसिस, भारती एअरटेल, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, टेक महिंद्रा, मारूती सुझुकी, एचसीएलटेक, रिलायन्स, बजाज फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट, कोटक महिंद्रा, एचडीएफसी लाईफ, सिप्ला, एशियन पेंटस, बजाज फिनसर्व्ह, एचयुएल, एम अँड एम, टाटा मोटर्स या समभागात वाढ झाली असून सनफार्मा, पॉवर ग्रीड, हिंदाल्को, जेएसडब्लू स्टील, ग्रासीम, टाटा कनज्यूमर प्रोडक्ट, कोल इंडिया, एनटीपीसी, टाटा स्टील, ब्रिटानिया, नेस्ले, आयटीसी, हिरो मोटोकॉर्प, डिवीज, डॉ रेड्डीज, अदानी पोर्टस या समभागात घसरण झाली आहे.
 
Powered By Sangraha 9.0